ऑटोमोबाईल

अख्ख मार्केट आता आपलंय! Tata Nano करणार ‘या’ अवतारात कमबॅक?

मुंबई । भारतातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या कारपैकी एक असलेली टाटा नॅनो (Tata Nano) पुन्हा एकदा नवीन कारणाने चर्चेत आली आहे. टाटा मोटर्स (Tata Motors) कडून ही छोटी कार इलेक्ट्रिक अवतारात परत आणण्याचा विचार सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

मात्र, या बाबत टाटा मोटर्स कंपनीने अद्याप नॅनो ईव्ही (Nano EV) च्या लॉन्चची अधिकृत घोषणा केलेली नाही. Tata Motors चे India Design Head Ajay Jain यांना Nano पुन्हा आणण्याबाबत विचारण्यात आले असता, त्यांनी ती परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे

संकेत दिले.


काही वर्षांनी Nano च्या इलेक्ट्रिक अवताराच्या कमबॅकची घोषणा करण्यास आपल्याला आनंद होईल, असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे Tata Nano EV Launch बाबतच्या चर्चांना पुन्हा वेग आला Tata Nano प्रेमी याकडे उत्सुकतेने पाहत आहेत आहे.

विशेष म्हणजे, Tata Motors ने यापूर्वी Jayem Automotives सोबत Jayem Neo नावाच्या Nano-आ

धारित इलेक्ट्रिक कारवर काम केले होते. ही कार प्रामुख्याने फ्लीट ऑपरेटरसाठी तयार करण्यात आली होती.


नवीन Nano EV आली तर ती Tiago.ev पेक्षा स्वस्त इलेक्ट्रिक कार म्हणून बाजारात आणली जाऊ शकते. शहरातील दैनंदिन प्रवास, आयुष्यातील पहिली कार घेणारे ग्राहक, दुचाकीवरून बजेट कारकडे अपग्रेड करणारे ग्राहक आणि दुसरी कार घेणाऱ्या कुटुंबांना ती लक्ष्य करू शकते.

Nano EV कारची संभाव्य रेंज तब्बल 180 ते 250 किमी असण्याची जोरदार चर्चा आहे; मात्र बॅटरी, रेंज, किंमत आणि लॉन्च तारीख यापैकी कोणतीही माहिती सध्या अधिकृत माहिती मिळाली नसली तरी चर्चाना मात्र उधाण आले आहे.

📢 Share this story:

Leave a Comment