
काल (दि. 24) दिवाळीच्या दिवशी करोडो शुभेच्छा मेसेजची आदान प्रदान करणारे WhatsApp हे सर्वात लोकप्रिय अॅप मंगळवारी तब्बल 2 तास बंद झाले होते. त्यानंतर अखेर मेटा कंपनीच्या (Meta Company) प्रयत्नांनी ही सेवा रिस्टोअर करण्यात आली आणि तब्बल 2 तासांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा एकदा WhatsApp सुरू झाले आहे. (WhatsApp Restored after down for almost 2 hours)
सुमारे 12-12.30 वाजल्यापासून ही सेवा ठप्प झाली होती. WhatsAppDown असा हॅशटॅगही ट्रेंडिंग होत होता. ही सेवा बंद पडल्याने मेसेज येण्या-जाण्यास मोठ्या प्रमाणात अडचण येत होती, त्यामुळे जगभरातील युजर्स त्रासले होते. पण अखेर 2.15 च्या सुमारास ही सेवा पुर्ववत झाली.
#UPDATE: #WhatsApp services have resumed after over an hour of outage pic.twitter.com/ggIkHO1mKo
— ANI (@ANI) October 25, 2022
दुपारी साडे बारा वाजल्यापासून कोणाला मेसेज जात नाहीत की कोणाला मेसेज येत नाहीत, अशी गोष्ट घडू लागली. यानंतर काही वेळातच #WhatsAppDown हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे. याचे कारण समजू शकले नव्हते. मेटा प्रवक्त्यांनी सांगितले की, आम्हाला माहिती आहे की सध्या काही लोकांना मेसेज पाठवण्यात समस्या येत आहे.
WhatsApp Down : मेसेज जाईनात की येईनात; व्हॉट्सअॅप झालं डाऊन
कंपनी ‘शक्य तितक्या लवकर’ सेवा रिस्टोअर करण्यासाठी काम करत आहे. जगभरात WhatsApp ला समस्या येत आहे. त्यानंतर अखेर 2.15 नंतर ही सेवा पुन्हा सुरू झाली. युजर्सना अॅपवर Connecting लिहिलेलं दिसत होतं. त्यामुळे ते कोणालाही मेसेज पाठवू शकत नव्हते. दुपारी 12 वाजल्यापासून युजर्सना ही अडचण येत असून ते कोणत्याही पर्सनल किंवा ग्रुपवर मेसेज पाठवू शकत नव्हते.
व्हॉट्सअॅपच्या मालकीची कंपनी Meta ने याबाबत आता माहिती दिली. “काही युजर्सना मेसेज पाठवण्यात समस्या येत आहेत. आम्ही ती समस्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी काम करत आहोत” असे त्यांनी म्हटले. त्यानंतर जगभरातील गोंधळ पाहता, व्हॉट्सअॅप सेवा तब्बल दोन तासांच्या प्रतिक्षेनंतर रिस्टोअर करण्यात आली.