रंगभूमीवरचा ‘बॅरिस्टर’ हरपला; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड

Share on Social Sites

पुणे । Pune :

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Veteran Marathi and Hindi film actor Vikram Gokhal) यांचे निधन झाले आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital in Pune) त्यांची प्राणज्योत मालवली. ते 77 वर्षांचे होते. गेल्या 15 दिवसांहून अधिक काळापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज (दि. 26) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले (Veteran Marathi and Hindi film actor Vikram Gokhal passes away) यांच्या निधनाची माहिती रुग्णालय प्रशासनानं पत्रकार परिषद घेऊन दिली.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर (Balagandharva Rangmandir, Pune) येथे विक्रम गोखले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार असून आज सायंकाळी 6 वाजता वैंकुठभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

विक्रम गोखले यांना घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला होता. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत (Durgabai Kamat) या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या अभिनेत्री होत्या. तर त्यांच्या आजी कमलाबाई गोखले (Kamalabai Gokhale) पुर्वीच्या कमलाबाई कामत या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. 1913 मध्ये दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ‘मोहिनी भस्मासुर’ (Mohini Bhasmasur) नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका साकारली होती. विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले (Chandrakant Gokhale) यांनी 71 हून जास्त हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या होत्या. विक्रम गोखले यांच्या पत्‍नीचं नाव वृषाली (Vrishali Gokhale) आहे.

See also  Bappi Lahiri : बॉलिवूडमधील दिग्गज संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचे निधन

विक्रम गोखले मालिका,नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात कार्यरत होते. विक्रम गोखले यांनी इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ (Hum Dil De Chuke Sanam) या चित्रपटात तो ऐश्वर्याच्या वडिलांच्या भूमिकेत दिसला होते. याशिवाय ते ‘भूल भुलैया’ (Bhool Bhulaiya), ‘दिल से’ (Dil Se), ‘दे दना दान’ (De Dana Daan), ‘हिचकी’ (Hichki), ‘निकम्मा’ (Nikamma), ‘अग्निपथ’ (Agnipath), ‘मिशन मंगल’ (Mission Mangal) या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले होते.

भिंगरी (Bhingri), माहेरची साडी (Maherchi Sari), लपंडाव (Lapandav), वासुदेव बळवंत फडके (Vasudev Balwant Phadke), सिद्धान्त (Vasudev Balwant Phadke) हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आघात’ (Aagaat) हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ (Anumati) या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. विक्रम गोखले यांची महत्त्वाची भूमिका असलेला गोदावरी हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला.

ओळख मिळाली ति ‘बॅरिस्टर’ या नाटकातून

विक्रम गोखलेंनी सुद्धा आयुष्यात अनेक भूमिका केल्या पण त्यांची खरी ओळख आहे ती बॅरिस्टर. जयवंत दळवी (Jaywant Dalvi) लिखित हे नाटक मराठी नाटकांमधील एक दर्जेदार नाटक म्हणून मानलं जातं. मानवी नातेसंबंधांची अनोखी बाजू या नाटकाने मांडली. बॅरिस्टर या नाटकात विक्रम गोखले आणि त्यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी एकत्र काम केले होते. याशिवाय कथा (Katha), कमला (Kamala), के दिल अभी भरा नही (Ke Dil Abhi Bhara Nahi), छुपे रुस्तम (Chupe Rustom), नकळत सारे घडले (Nakalat Saare Ghadale), दुसरा सामना (Dusara Samana), सरगम (Sargam), स्वामी (Swami) अशा अनेक नाटकात त्यांनी काम केले होते. मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय संन्यास घेतला होता.

बऱ्याच वर्षांनंतर मालिकेतून केलं होतं कमबॅक

विक्रम गोखले यांनी टेलिव्हिजनमध्येही एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 1989 ते 1991 या काळात दूरदर्शनवर चाललेल्या ‘उडान’ (Udaan) या प्रसिद्ध मालिकेतही त्यांनी काम केले होते. याशिवाय त्यांनी अग्निहोत्र, या सुखानों या, संजीवनी आणि सिंहासन या मालिकेत काम केले होते. अग्निहोत्री मालिकेत (Agnihotra serial) गोखलेंनी मोरेश्वर गोखलेंचे पात्र साकारले होते. त्यांची ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेनंतर अनेक वर्षांनंतर ते अलीकडेच ते छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujche Me Geet Gaat Aahe) या मालिकेत दिसले होते. विक्रम गोखलेंनी मालिकेत गुरु पंडित मुकूल नारायण (Guru Pandit Mukul Narayan) यांचे पात्र साकारले होते.

See also  Maharashtra Police : खुशखबर! महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी; आता १२ ऐवजी..

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  Padma Award 2022 : १२८ जणांना पद्म पुरस्कारांची घोषणा, पाहा संपूर्ण यादी

Share on Social Sites