मुंबई । Mumbai :
ट्विटरचे नवे मालक एलन मस्क (Twitter new owner Elon Musk) यांनी नुकतेच त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट करून स्पष्ट केले आहे की, आता ट्विटरवर नकली अकाउंट चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची तयारी सुरू आहे.
मस्क म्हणाले की, ट्विटरवर कोणतेही अकाउंट बनावट असल्याचे आढळून आले तर ते, तात्पुरते नव्हे तर कायमचे निलंबित केले जाईल. स्पेसएक्सचे संस्थापक एलन मस्क (SpaceX founder Elon Musk) यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, यापूर्वी आम्ही ट्विटर युजरला निलंबनापूर्वी सावध करायचो.
Going forward, any Twitter handles engaging in impersonation without clearly specifying “parody” will be permanently suspended
— Elon Musk (@elonmusk) November 6, 2022
परंतु, आता व्हेरिफिकेशनचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे. आता अकाउंट सस्पेंड (Account Suspend) करण्यापूर्वी युजरला कोणत्याही प्रकारची चेतावणी दिली जाणार नाही. (Parody account will be suspended and users may lose Blue Tick as well Says Elon Musk)
एवढेच नाही तर, ब्लू टिक (Twitter Blue Tick) बॅज असलेल्या कोणत्याही युजर्सने त्याच्या खात्याचे नाव बदलल्यास ब्लू टिक तात्पुरती काढून टाकली जाईल. काही काळापूर्वी ट्विटरने ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन समाविष्ट करण्यासाठी Apple iPhone द्वारे वापरलेले Twitter iOS ॲप अपडेट केले होते. अपडेटनंतर, ॲपमध्ये दिसत आहे की, युजरला प्रति महिना $7.99 (जवळपास 665 रुपये) द्यावे लागतील.
Any name change at all will cause temporary loss of verified checkmark
— Elon Musk (@elonmusk) November 6, 2022
ट्विटर ब्लू या देशांमध्ये व्हेरिफिकेशनसह उपलब्ध (Twitter Blue is available with verification in these countries)
ट्विटर ब्लू सध्या कॅनडा (Canada), यूएस (US), न्यूझीलंड (New Zealand) आणि यूके (UK) मधील युजरसाठी ट्विटर iOS मध्ये सत्यापनासह उपलब्ध आहे. तसेच, जेव्हापासून Elon Musk ने ट्विटर ‘ब्लू टिक’ची फी आकारण्याबद्दल सांगितले आहे, तेव्हा पासून Elon Musk ला जगभरातून वेगवेगळ्या ठिकाणी युजर्सकडून टीकेला सामोरे जावे लागत आहे.
केवळ ब्लू टिक्सच नाही तर, एलन मस्कचे त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबतचे वागणे आणि ट्विटरवर काम करणाऱ्या लोकांनाही कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळे लोकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. नुकतेच मस्क यांनी ट्विटर कंपनीतून बाहेर काढलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहे.