
गेल्याकाही वर्षात फेसबुकची (Facebook) लोकप्रियता कमालीची कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे व त्याची जागा आता इंस्टाग्राम (Instagram) ने घेतली आहे. इंस्टाग्राम हे आता केवळ फोटो शेअरिंग अॅप (Photo Sharing App) राहिलेले नाही. यावर फोटोसोबतच तुम्ही व्हिडिओ, स्टोरीज देखील शेअर करू शकता. यासह इंस्टाग्राम हे कमाईचे देखील मोठे माध्यम आहे. (Increase Instagram Followers)
मात्र, यासाठी तुमचे लाखो फॉलोअर्स असणे गरजेचे आहे. तुमचे जेवढे जास्त फॉलोअर्स असतील तेवढे तुम्ही लोकप्रिय आहात, असे मानले जाते. जास्त फॉलोअर्स असल्यास कमाई देखील अफाट होते. जर तुमचे सध्याला इंस्टाग्रामवर कमी फॉलोअर्स (Followers) असल्यास तुम्ही काही या काही सोप्या टिप्स वापरू शकता. या खास टिप्सविषयी जाणून घेऊया.
https://twitter.com/instagram
क्वॉलिटी कॉन्टेंट आवश्यक (Quality content is essential)
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचे असतील तर क्वॉलिटी कॉन्टेंट खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इंस्टाग्राम फॉलोअर्स (Instagram Followers) वाढवण्यासाठी तुम्हाला सातत्याने चांगल्या क्वॉलिटचे फोटो (Quality Photo), क्रिएटिव्ह व्हिडिओ (Creative Video) अपलोड करावे लागतील. तसेच, हा कॉन्टेंट इतरांपेक्षा हटके असणे गरजेचे आहे.
नियमित फोटो, व्हिडिओ करा अपलोड (Upload Photos, Videos regularly)
तुम्ही जर आठवड्यातून अथवा महिन्यातून एकदाच इंस्टाग्रामवर फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करत असाल तर ही सवय त्वरित बदला. तुम्हाला जर इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचे असतील तर नियमित फोटो, व्हिडिओ, रिल्स (Instagram Reels) अपलोड करा.
आलेल्या कमेंट्सला द्या उत्तर (Reply to Comments)
तुमच्या फोटो, व्हिडिओवर इतर यूजर्सच्या भरपूर कमेंट्स येत असतील. परंतु, तुम्ही अशा कमेंट्सकडे दुर्लक्ष करत असाल तर यात बदल करा. ऑडियन्सला इंगेज ठेवण्यासाठी वेळोवेळी कमेंटवर रिप्लाय देणे गरजेचे आहे.
हॅशटॅगचा करा वापर (Use Hashtags)
तुमच्या इंस्टाग्राम पोस्टवर त्यासंबंधित हॅशटॅगचा वापर नक्की करा. ट्रेंडिंग टॉपिकबाबत (Trending Topics) कंटेंट बनवण्याचा प्रयत्न करा व त्यासंबंधित हॅशटॅग वापरा. हॅशटॅगमुळे तुमची पोस्ट व्हायरल होऊ शकते व तुमचे फॉलोअर्स देखील वाढतील.
चांगले कॅप्शन द्या (Give a good Caption)
फोटो अथवा व्हिडिओ टाकताना त्यासंबंधित चांगले कॅप्शन देखील द्या. कॅप्शन कमी शब्दांचे व आकर्षक असेल, हे लक्षात ठेवा. या टिप्सचा नियमित वापर करून तुम्ही सहज फॉलोअर्स वाढवू शकता.