Eng Vs Pak : बटलरची ‘ब्रिटीश आर्मी’च चॅम्पियन, ‘बाबर’ सेना ढेर

Share on Social Sites

मेलबर्न । Melbourne :

पाकिस्तानच्या 138 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडलाही संघर्ष करण्यास भाग पाडले. हॅरीस रौफ (Haris Rauf), नसीम शाह (Naseem Shah) व शादाब खान (Shadab Khan) यांनी टिच्चून मारा करताना पाकिस्तानला सामन्यात कायम राखले होते. (T20 World Cup Final England Vs Pakistan)

परंतु, अखेरच्या षटकात शाहिन शाह आफ्रिदीला (Shahin Afridi) दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि मोईन अली (Moeen Ali) यांनी हात मोकळे करताना इंग्लंडला जेतेपद मिळवून दिले. वेस्ट इंडिज (West Indies) नंतर टीट्वेंटी-20 वर्ल्ड कप दुसऱ्यांदा उंचावणारा इंग्लंड दुसरा संघ ठरला. यापूर्वी त्यांनी 2010 मध्ये पॉल कॉलिंगवूडच्या (Paul Collingwood) नेतृत्वाखाली ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. (T20 World Cup England beat Pakistan by 5 wickets at Melbourne)

ॲलेक्स हेल्सला (Alex Hales) पहिल्याच षटकात शाहिन आफ्रिदीने (Shaheen Afridi) त्रिफळाचीत केले. फिल सॉल्ट (Phil Salt) (10) अपयशी ठरला. पाकिस्तानची डोकेदुखी वाढवणाऱ्या जोस बटलरची (Jos Buttler) (26) विकेट हॅरीस रौफने घेतली. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना इंग्लंडच्या धावगतीवर लगाम लावली होती. बेन स्टोक्स (Ben Stokes) व हॅरी ब्रुक (Harry Brook) ही जोडी त्यांचा सामना करत होती आणि इंग्लंडने पहिल्या 10 षटकांत 3 बाद 77 धावा केल्या.

See also  देशातली पहिली BSL-3 लॅब नाशिकमध्ये; २५ कोटी खर्चून निर्मिती, काय काम, महामारीत महत्त्व कसे?

त्यांना विजयासाठी 60 चेंडूंत 61 धावा करायच्या होत्या. शादाबने इंग्लंडला चौथा धक्का दिला. एकेका धावेसाठी झगडणाऱ्या इंग्लंडच्या ब्रुकने (20) मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला अन् शाहिन आफ्रिदीने (Shaheen Afridi) त्याचा झेल घेतला. पण, यात आफ्रिदीने स्वतःचा गुडघा दुखावून घेतला आणि त्याला मैदाना बाहेर जावे लागले. पण, प्राथमिक उपचारानंतर तो मैदानावर परतला.

इंग्लंडला अखेरच्या 5 षटकांत 41 धावा करायच्या होत्या. आफ्रिदी 16 वे षटक फेकायला आला खरा, परंतु त्याला गोलंदाजी करताना वेदना होत असल्याचे जाणवत होते. त्याला 1 चेंडू फेकून मैदान सोडावे लागले. इफ्तिखार अहमद (Iftikhar Ahmed) ते षटक पूर्ण करण्यासाठी आला अन् स्टोक्सने चौकार-षटकार खेचून त्याच्या 5 चेंडूंत 13 धावा चोपल्या. त्यानंतर मोईन अलीने (Moeen Ali) हात मोकळे केले.

18 चेंडूंत 12 धावा असा सामना पूर्णपणे इंग्लंडच्या बाजूने झुकला. अखेरच्या 12 चेंडूंत 7 धावा हव्या असताना अली (19) बाद झाला. अली व स्टोक्स यांनी 48 धावांची भागीदारी केली आणि ती निर्णायक ठरली. स्टोक्ने चौकार खेचून ट्वेंटी-20तील पहिले अर्धशतक पूर्ण केले. स्टोक्स 48 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारांसह 51 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडने 5 विकेट्स राखून सामना जिंकला. वन डे आणि ट्वेंटी-20 असे दोन्ही वर्ल्ड कप जेतेपद एकाच वेळी कायम राखणारा पहिला संघ ठरला.

आदिल रशीद, सॅम करनची तुफान गोलंदाजी (Storm bowling by Adil Rashid, Sam Curran)

मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) (15), मोहम्मद हॅरीस (Mohammad Haris) (8), इफ्तिखार अहमद (Iftikhar Ahmed) (0) हे आज अपयशी ठरले. कर्णधार बाबर आजम (Captain Babar Azam) (32) आणि शान मसूद (Shan Masood) (38) हे पाकिस्तानच्या आजच्या डावातील टॉप स्कोअरर ठरले. पाकिस्तानने 15 षटकांत 4 बाद 106 धावा केल्या होत्या आणि मसूद व शादाब खान (Shadab Khan) फटकेबाजी करत होते. सॅम करनने (Sam Karan) ही डोईजड झालेली जोडी तोडली.

मसूद 38 धावांवर बाद झाला. सॅम करन हा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेच्या एका पर्वात इंग्लंडकडून सर्वाधिक 11 विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. रशीदने 4-1-22-2 आणि ख्रिस जॉर्डनने (Chris Jordan) 4-0-27-2 अशी उल्लेखनीय गोलंदाजी केली. पाकिस्तानने 11 षटकांत 2 बाद 84 धावा केल्या होत्या, परंतु पुढील 9 षटकांत त्यांनी 53 धावांत 6 विकेट्स गमावल्या.

See also  बापरे! 15 दिवसांत 3 बंगाली अभिनेत्रींची आत्महत्या, नेमकं काय घडलं?

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  Blog (विशेष लेख) : उद्धवजी, सरकार विषयीच्या सहानुभूतीला 'घर-घर' लागेल असे निर्णय घेऊ नका...

Share on Social Sites