Nashik News : नाशकात कोरोनानंतर ‘या’ रोगाचे संकट! महिन्याभरात तब्बल 11 जणांचा मृत्यू

Swine Flu in Nashik news
Share on Social Sites

नाशिक । Nashik :

शहरात सध्या ताप, सर्दी पडसे आदींचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यातच डेंग्यूसह (Dengue) स्वाइन फ्लूनेही डोके वर काढल्याने नागरिकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. महापालिका कार्यक्षेत्रात दि. 01 जानेवारीपासून आतापर्यंत स्वाइन फ्लूचे (Swine Flu News in Marathi) एकूण 94 रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, शहरातील खासगी, शासकीय आणि महापालिकेच्या रुग्णालयाकंडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार एकूण 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (11 people died dur to Swine Flu Nashik)

स्वाइन फ्लूळे मृत्यू झालेल्यांमध्ये नाशिक ग्रामीण (Nashik Rural) 4, नाशिक मनपा हद्द (Nashik City) 3, अहमदनगर जिल्हा (Ahmednagar district) 3 आणि पालघर जिल्ह्यातील (Palghar district) एका रुग्णाचा समावेश आहे. शहरातील नागरिकांनी स्वाइन फ्लूला घाबरून न जाता मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य सुत्रांनी केले आहे. त्याचबरोबर काही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी, असेही नाशिक महानगरपालिकेने सांगितले आहे.

सध्या पावसाळ्यामुळे वातावरणात झालेला बदलही सााथीच्या आजारांना पूरक ठरत असल्याने शहरात ताप (Fever), थंडी (Colds), सर्दी, खोकला, पडसे (coughs) आदी आजारांचे रुग्ण घरोघरी आढळून येत आहे. त्यातच स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण असले तरी घाबरून न जाता सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

See also  4G झाले जुने आता येणार 5 जी, 10 पट वेगाने मिळणार सेवा; मंत्रिमंडळ बैठकीत स्पेक्ट्रम लिलावास मंजूरी, 'हे' होणार फायदे

सन 2017 मध्ये शहरात स्वाइन फ्लूचा उद्रेक झाल्यासरखी परिस्थिती निर्माण झाली होती. तब्बल 264 रुग्णांना या आजाराने ग्रासले होते. त्यापैकी 32 रुग्णांना स्वाईन फ्ल्यूने बळी घेतला होता. त्यानंतर 2018 मध्येही 241 रुग्ण आढळले होते. त्यावेळी 24 रुग्ण दगावले होते.

सन 2019 मध्ये 178 रुग्णांची नोंद होऊन त्यापैकी 11 जणांना जीव गमवावा लागला होता. सन 2020 मध्ये 6 जणांना या आजाराची बाधा झाल्याची नोंद आहे. आता पुन्हा स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढले असून, आतापर्यंत 94 रुग्णांना लागण झाली असून, 11 जण दगावले आहेत.

सतर्कता बाळगावी

नागरिकांनी स्वाइन फ्लूला न घाबरता सतर्कता बाळगावी. इन्फ्लूएंझा एच 1 एन 1 (Influenza H1N1) टाळण्यासाठी हस्तांदोलन टाळा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका, फ्ल्यूसदृश लक्षणे आढळल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, असे आवाहन मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे (NMC Health Officer Dr. Bapusaheb Nagargoje) यांनी केले आहे. याशिवाय टिश्यू पेपरची त्वरित विल्हेवाट लावावी, वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवावेत, लिंबूवर्गीय फळे-हिवा भाजीपाला आहारात घ्या, पौष्टिक आहर घ्यावा, धुम्रपान टाळावे, पुरेश झोप व विश्रांती घ्यावी, असेही डॉ. नागरगोजे यांनी सांगितले.

स्वाइन फ्लूची लक्षणे (Symptoms of swine flu)

ताप, घसादुखी, घसा खवखव होणे, खोकला, सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी आदी स्वाईन फ्ल्यूची लक्षणे असून, ज्या नागरिकांना अशी लक्षणे आढळून आल्यास त्यांनी त्वरित महापालिकेच्या, शासकीय वा खासगी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे आवश्यक आहे.

See also  लडाखमध्ये 7 जवानांना वीरमरण

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  मोदी सरकारचं आणखी एक मोठ गिफ्ट; स्वस्तात पूर्ण होणार घराचं स्वप्न

Share on Social Sites