मुंबई l Mumbai (वि. प्र.) :
राज्यात उन्हाचा (Summer) कडाका प्रचंड वाढला आहे. सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसांत अबाल वृद्धांसह सर्वांनाच अनेक शारिरीक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तपमानाने 40 शी कधीच पार केली आहे.
आत्ताच जर अशी परिस्थिती तर पुढील मे (May) महिन्यात किती ऊन असेल याची कल्पना येऊ शकते. कडक उन्हाळ्यात चक्कर येणे (Dizziness), मळमळ होणे (Nausea) तसेच अपचन होणे (Indigestion) या सारख्या समस्या होत असतात. शिवाय या दिवसात प्रचंड घाम देखील येतो. यामुळे, त्वचेशी संबधित समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. त्वचेवर रॅशेस (Rashes) येणे, खाज (Itching), घामोळ्या (Sweaty Pores) येणे आदी समस्या उद्भवत असतात.
उन्हाळ्यात सर्वात जास्त त्रास होतो तो घामोळ्यांचा पाठ, मानेवर किव्हा कमरेवर अशा विविध ठिकाणी बारीक लाल पुरळ येऊन काहीशी जळजळ होते. याचा त्रास लहानांपासून मोठ्यानं पर्यंत अनेकांना होतो. त्यामुळे या पासून वाचण्यासाठी लोकं विविध घरगुती उपाय करतात. काही ठराविक घरगुती उपायांमुळे तुम्ही घामोळ्यांपासून स्वत:चे संरक्षण करू शकतात.
बापरे! राज्यात दोन महिन्यांत उष्माघाताचे 25 बळी.. गेल्या 8 वर्षांतील उच्चांकी नोंद
कोरफडचा गर (Aloe Vera)
कोरफडच्या गराने बर्यापैकी आराम मिळू शकतो. दिवसातून दोन ते तीन वेळा कोरफडचा गर त्वचेला लावल्यास घामोळ्यांच्या त्रासातून सुटका होईल. कोरफडच्या गरामध्ये अँण्टीसेप्टिक (Antiseptic) आणि अँण्टीबॅक्टेरियल (Antibacterial) तत्त्व आहे. त्यामुळे त्वचेवर चट्टे उठणे, खाज येणे, इरिटेशन अशा प्रकारचे त्रास दूर होतात. कोरफड गरामुळे त्वचा लाल होणे, इंफ्लेमेशन (Inflammation) अशा प्रकारच्या त्वचेच्या समस्या दूर होऊन त्वचा मुलायम व्हायला मदत होते शिवाय त्वचेला गारवा मिळतो.
मुलतानी माती (Multani Soil)
मुलतानी माती आणि गुलाब पाणी (Rose water) एकत्र करुन घामोळ्याच्या जागेवर लावा सुकल्यानंतर धुवून टाका. हे मिश्रण आठवड्यातून चार वेळा लावा. तुम्हाला आराम मिळेल.
सावधान! कोरोनानंतर भारतात आता ‘शिगेला’चे थैमान; 58 रुग्ण, एकाचा मृत्यू
कच्च्या बटाट्याचा रस (Raw potato juice)
कच्च्या बटाट्याच्या रसात गुलाब पाणी मिसळून घामोळ्या आलेल्या जागी लावावे. 20 मिनिटानंतर साध्या पाण्याने धुवून टाका.
चंदन पावडर (Sandalwood powder)
चंदन पावडर आणि गुलाब जल एकत्र करून ही पेस्ट 20 ते 25 मिनिटे घामोळ्यांवर लावून ठेवल्यानेही घामोळयांची समस्या दूर होते.
कडूलिंब (Neem)
कडूलिंबाच्या पानांनी त्वचेचे इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते. कडूलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून लावल्याने घामोळयांची समस्या दूर होते. तसेच सकाळी अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पानं उकळवून त्याने अंघोळ केल्यानेही फायदा होतो.
उन्हात जाताना उपाशी पोटी जाणे टाळावे. घराबाहेर पडण्याआधी नाश्ता जरूर करावा. ह्या दिवसात जेवणात वरून मीठ, लोणचे, उडिदाचा पापड, फरसाण आदी घेणे टाळा. पर्यायाने पाणी भरपूर प्रमाणात प्यावे. जेणे करून शरीराची ह्या दिवसात होणारी झीज वेळोवेळी भरून निघेल. तसेच घरा बाहेर पडताना सैल सुती कपडे घालावे जेणे करून घामोळ्यांचा त्रास काहीसा कमी होईल. यासह काही घरगुती उपाय करून देखील घामोळ्यांपासून बचाव करता येऊ शकतो.
: डॉ. मिलिंद देशमुख, एम. डी. (त्वचा रोग तज्ञ)