
कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Comedian Raju Srivastava) यांची झुंज अखेर अपयशी ठरली आहे. राजू श्रीवास्तव यांचं एम्स रुग्णालयात निधन झाले आहे. ते 58 वर्षांचे होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर गेल्या 41 दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्यावर डॉक्टरांची मोठी विशेष टीम उपचार करत होती. मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले असून आज अखेर राजू श्रीवास्तवयांची प्राण ज्योत मालवली. (Superstar Comedian Raju Srivastava passes away at AIIMS)
डॉक्टरांनी त्यांना आधीच ब्रेन डेड म्हणून घोषित केल होत. आज (दि. 21) त्यांच्या हृदयाचे ठोके मंदावल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. हिंदी सिनेसृष्टीत अनेक वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या अचानक जाण्यानं हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा निर्माण झाली असून सर्व स्थरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूपश्यात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहे.
राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नव्हती. दरम्यान, त्याचा ब्रेन डॅमेज झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांना उपचारांती व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक होती.
We will miss you @iRajuSrivastava!
You made the nation 🇮🇳 believe that stand up comedy can also be a profession.
May you now make heaven a happier place. #राजू_श्रीवास्तव #RajuSrivastav Ohm Shanti! pic.twitter.com/404O70mncJ
— nitin singh (@SinghNitn) September 21, 2022
राजू श्रीवास्तव यांना कलेचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला. त्यांचे वडील रमेश चंद्रा श्रीवास्तव (Ramesh Chandra Srivastava) हे प्रसिद्ध कवी होते. राजू लहानपणापासून अनेकांची मिमिक्री करायचे. कलेची त्यांना विशेष आवड होती. लहानपणापासूनच त्यांना एक कॉमेडियनच व्हायचं होतं. टीव्ही शो, कॉमेडी शो अवॉर्ड होस्ट करण्यापासून त्यांच्या प्रवास सुरु झाला.
राजू श्रीवास्तव संपूर्ण जगभर कॉमेडी शो करत होते. त्याचप्रमाणे त्यांनी आपली ऑडिओ व्हिडीओ सीरिजही काढली आहे. आजवर त्यांनी अनेक जाहिरातीत देखील काम केलं आहे. राजू श्रीवास्तव यांनी 1993 मध्ये लग्न केलं. शिखा श्रीवास्तव (Shikha Srivastava) असं त्यांच्या पत्नीचं नाव असून त्यांना दोन मुलं आहे. मुलाचं नाव आयुष्मान श्रीवास्तव (Ayushman Srivastava) आहे तर मुलीचं नाव अंतरा श्रीवास्तव (Antar Srivastava) आहे.
Famous for clean and healthy comedy
Raju Srivastava RIP
💔💔#राजू_श्रीवास्तव #गजोधर #OmShanti #rajusrivastava #RIP pic.twitter.com/X0RyuCpAbX— SarcasmHit (@SarcasmHit) September 21, 2022
1988 मध्ये अभिनयाला केली सुरुवात, 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश
राजू श्रीवास्तव केवळ विनोदी कलाकारच नाही तर अभिनेते आणि राजकारणीदेखील होते. 1988 मध्ये छोट्या भूमिकांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे राजू श्रीवास्तव सलमान खानच्या ‘मैंने प्यार किया’ (Main Pyaar Kiya) सिनेमात दिसले होते. नंतर त्यांनी आणखी काही सिनेमे केले आणि नंतर कॉमेडीमध्ये प्रवेश केला. राजू श्रीवास्तव यांना द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज (The Great indian laughter challenge), कॉमेडी का महामुकाबला (Comedy ka Maha Muqabla) यांसारख्या शोमधून ओळख मिळाली. ते ‘बिग बॉस 3’ (Big Boss 3) आणि ‘नच बलिए’ (Nach Baliye) सारख्या शोमध्येही दिसले होते.
ट्रेड मिलवर धावताना आला हृदयविकाराचा झटका
दि. 10 ऑगस्टला जीममध्ये ट्रेड मिलवर धावत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर राजू श्रीवास्तव बेशुद्ध झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची एन्जिओग्राफी करण्यात आली मात्र एन्जिओग्राफी नंतरही ते बेशुद्धच असल्याची माहिती समोर आली होती. मिळालेल्या माहितीनुसार एन्जिओग्राफिमध्ये एका ठिकाणी 100 टक्के ब्लॉक सापडल्याचे सांगण्यात आले होते. तेव्हा पासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. गेल्या आठ दिवसांपासून ते बेशुद्ध होते. आज त्यांची प्रकृती आधीपेक्षा खराब असून मेंदू जवळपास ‘डेड’ अवस्थेत पोहोचला होता आणि हार्टमध्येही समस्या होत्या.