प्रमोद अन् हरसंगाचे जोरदार झटके! पाकिस्तनाला हरवत श्रीलंकेची ‘आशिया कप’वर सहाव्यांदा मोहर

Sri Vs Pak : पाकिस्तनाला हरवत श्रीलंकेची 'आशिया कप'वर सहाव्यांदा मोहर
Share on Social Sites

श्रीलंकेने आशिया चषक 2022 स्पर्धा जिंकली आहे. स्पर्धेचा पहिलाच सामना गमावल्यानंतर श्रीलंकेने जबरदस्त कमबॅक केले आणि सलग 5 विजय मिळवून जेतेपदाला गवसणी घातली. 8 वर्षांनंतर श्रीलंकेने आशिया चषक उंचावला.

पाकिस्तानला (Pakistan) 2012 आशिया चषक जिंकता आला नाही. वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) व भानुका राजपक्षा (Bhanuka Rajapaksa) यांनी फलंदाजीत कमाल करताना श्रीलंकेला 170 धावांचा टप्पा गाठून दिला. त्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी कमाल करताना पाकिस्तानला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. हसरंगाने टाकलेले 17वे षटक कलाटणी देणारे ठरले. (Sri Lanka defeated Pakistan in the final by 23 runs to lift the Asia Cup 2022)

कर्णधार बाबर आजम (Captain Babar Azam) याचा अपयशाचा पाढा अंतिम सामन्यातही कायम राहिला. मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) व इफ्तिकार अहमद (Iftikhar Ahmed) यांनी पाकिस्तानचा डाव सावरताना 59 चेंडूंत 71 धावा जोडल्या. ही डोईजड झालेली जोडी तोडण्यासाठी पुन्हा मदुशानला (Madushan) गोलंदाजीला बोलावले गेले आणि त्याने त्याचे काम केले.

त्याने टाकलेला संथ चेंडू अहमदने उत्तुंग टोलावला अन् के बंडाराने (K Bandara) अप्रतिम झेल घेतला. अहमद 31 चेंडूंत 32 धावांवर बाद झाला. पाकिस्तानला विजयासाठी 30 चेंडूंत 70 धावांची गरज असताना चमिका करुणारत्नेने (Chamika Karunaratne) मोठा धक्का दिला. संथ व आखूड चेंडू टाकून त्याने मोहम्मद नवाजला (Mohammad Nawaz) फटका मारण्यास भाग पाडले. मदुशानने सुरेख झेल टिपत नवाजला 6 धावांवर माघारी पाठवले. रिझवानने षटकार खेचून 47 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि संघावरील दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला.

चार षटकांत 61 धावा पाकिस्तानला करायच्या होत्या. वनिंदू हसरंगाने (Vanindu Hasranga) 17व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रिझवानची विकेट घेतली. षटकार मारण्याच्या प्रयत्नात रिझवान (55 धावा) गुणतिलकाच्या हाती झेलबाद झाला. एका चेंडूच्या अंतराने हसरंगाने आणखी एक विकेट घेताना आसीफ अलीचा (Asif Ali) (0) त्रिफळा उडवला. त्याच षटकात खुशदील शाह (Khushdil Shah) (2) याला बाद करून पाकिस्तानची अवस्था त्याने 7 बाद 112 अशी केली. महिष थिक्षानाने (Maheesh Theekshana) 8वा धक्का दिला, तर मदुशानने समन्यातील चौथी विकेट घेतली. मदुशानने 34 धावांत 4 विकेट्स घेतल्या. 6 चेंडूत 32 धावा करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला. श्रीलंकेने 147 धावांत पाकिस्तानला गुंडाळून 23 धावांनी विजय मिळवला.

हसरंगा व राजपक्षा यांची वादळी खेळी…

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना पाकिस्तानने दमदार सुरुवात केली. कुसल मेंडीस (0), पथूम निसंका (Pathum Nisanka) (8), दानुष्का गुणतिलका (Danushka Gunatilka) (१), कर्णधार दासून शनाका (Captain Dasun Shanaka) (2) व धनंजया डी सिल्वा (Dhananjaya de Silva) (28) हे फलकावर 58 धावा असताना माघारी परतले. वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) व भानुका राजपक्षा (Bhanuka Rajapaksa) यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. 36 चेंडूंत 58 धावांची ही भागीदारी रौफने संपुष्टात आणली. हसरंगा 21 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह 36 धावांवर माघारी परतला. राजपक्षाचा झेल टिपण्याच्या प्रयत्नात शादाब खान व आसीफ अली यांच्यात जोरदार टक्कर झाली.

आसीफच्या हातात येणारा सोपा झेल शादाबच्या डाईव्हमुळे सीमापार गेला अन् श्रीलंकेला षटकार मिळाला. शादाबला आजच्या सामन्यात दुसऱ्यांदा दुखापत झाली. राजपक्षाने सातव्या विकेटसाठी चमिका करुणारत्नेसह 31 चेंडूंत 54 धावा जोडल्या व संघाला 6 बाद 170 धावांचा टप्पा गाठून दिला. राजपक्षाने 45 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 71 धावा केल्या.

See also  नवजोत सिद्धू यांना ‘सुप्रीम’ झटका; सुनावली सश्रम कारावासाची शिक्षा, वाचा नेमकं काय आहे प्रकरण?

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  खळबळजनक! पुण्यात किडनी रॅकेटचा पर्दाफाश, 'रुबी'च्या 15 डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Share on Social Sites