Singer KK Death : ‘हम रहें या ना रहें कल, कल याद आयेंगे ये पल’; प्रसिद्ध गायक केके यांचे निधन

'हम रहें या ना रहें कल, कल याद आयेंगे ये पल'; प्रसिद्ध गायक केके यांचे निधन l Singer KK dies at 53 after live performance in Kolkata: ‘Voice of love is gone’
'हम रहें या ना रहें कल, कल याद आयेंगे ये पल'; प्रसिद्ध गायक केके यांचे निधन l Singer KK dies at 53 after live performance in Kolkata: ‘Voice of love is gone’
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

सुप्रसिद्ध गायक केके उर्फ कृष्ण कुमार कुन्नथ (KK Krishna Kumar Kunnath) यांचे निधन झाले आहे. ते कोलकाता (Kolkata) येथे कॉन्सर्टसाठी गेले होते. मात्र, कॉन्सर्टनंतर अचानकपणे त्यांची प्रकृती खालावली आणि ते खाली कोसळले. यानंतर त्यांना तत्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ते 53 वर्षांचे होते.

मिळालेल्या माहतीनुसार, केके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. (Singer KK death news) मात्र यासंदर्भात अद्याप डॉक्टरांनी कसल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

केके हे बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वोत्तम गायकांपैकी एक होते. त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी जवळपास 200 हून अधिक सुपरहिट गाणी (KK Super hit songs) दिली आहेत. 90 च्या दशकातील त्यांच्या त्यांच्या ‘यारो’ (Yaaron) या गाण्याने त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. केके यांनी रोमॅण्टिक गाण्यांसोबतच (KK Romantic songs) पार्टी साँग्सदेखील गायले आहेत.

केकेंनी गायलेले गाणे हे नेहमीच आणि आजही नवे-नवे वाटतात. त्यांनी गायलेले ‘खुदा जाने’ (Khuda Jaane) हे रोमॅन्टिक गाणे, ‘इट्स द टाइम टू डिस्को (‘It’s the time to disco), कोई कहे कहता रहे (Koi kahe kahta rahe), तडप तडप के इस दिल से’ (Tadap tadap ke is dil se), सारखे गाणे अगदी हृदयाला स्पर्श करतात.

याशिवाय, शाहरुख खानचा (Shahrukh Khan) चित्रपट ओम शांति ओमचे (Om Shanti Om) गाणे ‘आंखों में तेरी अजब सी’ (Ankho me teri ajab si), बजरंगी भाईजानचे (Bajrangi Bhaijaan) ‘तू जो मिला’ (Tu Jo Mila), इकबाल (Iqbal) फिल्मचे ‘आशाएं’ (Aashayein) आणि अजब प्रेम की गजब कहानी (Ajab prem ki ghazab kahani) चित्रपटातील गाणे ‘मैं तेरा धडकन तेरी’ (Me tera dhadkan teri) ही त्यांच्या चाहत्यांतील सर्वाधिक पॉप्युलर गाणी होती.

केके यांच्या अकाली निधनाबद्दल पंतप्रधान मोदींनीही (PM Modi) दुःख व्यक्त केले आहे. “केके नावाने प्रसिद्ध असलेले गायक कृष्णकुमार कुन्नाथ यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले. त्याच्या गाण्यांमध्ये सर्व वयोगटातील लोकांसाठीच्या भावनांचे प्रतिबिंब दिसत. ते त्यांच्या गाण्यांच्या माध्यमाने नेहमीच आपल्या स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबा प्रति आणि चाहत्यांप्रती संवेदना. ओम शांती,” अशा आशयाचे ट्विट मोदींनी केले आहे.

सनी लिऑनीला ‘टफ’ देण्यासाठी आणखी एका ‘पॉर्न स्टार’ची बॉलिवूडमध्ये एंट्री

See also  Sonali Phogat Death : टिकटॉक स्टार, भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच अकाली निधन

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  Video : 'मरेन, पण...', ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

Share on Social Sites