लोकसभेतही सेना फुटली! 12 बंडखोर खासदारांच्या ‘शिंदे गटा’ला अध्यक्षांची मान्यता

Shivsena broke in Loksabha president approves 12 rebel MPs
Share on Social Sites

नवी दिल्ली l New Delhi :

शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ (Shiv Sena MLA) लोकसभेतील खासदारांनी देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Party chief Uddhav Thackeray) यांच्या विरुद्ध बंड पुकारल्याने आता लोकसभेच्या संसदीय पक्षातही उभी फूट पडली आहे. राहुल शेवाळे यांना शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Lok Sabha Speaker Om Birla) यांनी मंगळवारी (दि. 19) मान्यता दिली. (Shiv Sena brokeup in Loksabha president approves 12 Rebel MPs)

ओबीसी आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा; दोन आठवड्यात निवडणुका घ्या : SC

लोकसभा अध्यक्षांचा हा निर्णय उद्धव ठाकरे गटासाठी धक्कादायक मानला जात आहे. शिंदे गटाला अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर या गटाने लोकसभेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात कार्यालयाचा ताबा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

शिवसेनेचे 12 खासदार मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले. या 12 जणांनी स्वतंत्र गटाची स्थापना स्थापना करीत लोकसभेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे (Rahul Shewale as Lok Sabha group leader) यांची, तर प्रतोदपदी भावना गवळी (Bhavna Gawli as vice president) यांची निवड केली. या गटास लोकसभेत शिवसेनेचा स्वतंत्र गट म्हणून मान्यता द्यावी, असे पत्र त्यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले.

शिंदे गटाच्या प्रतोद म्हणून व्हिप काढण्याचा अधिकार पूर्वीप्रमाणेच भावना गवळी यांच्याकडे असेल. मात्र लोकसभेतील गटनेता आम्ही बदलला, असे या गटाकडून सांगण्यात आले. लोकसभाध्यक्षांची भेट घेण्यापूर्वी स्वतंत्र गट स्थापन करणार्‍या 12 खासदारांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

यावेळी झालेल्या बैठकीत स्वतंत्र गट स्थापन करण्यात आला. बैठकीत खासदार धैर्यशील माने (MP Darishsheel Mane), हेमंत गोडसे (Hemant Godse), हेमंत पाटील (Hemant Patil), कृपाल तुमाने (Kripal Tumane), श्रीरंग बारणे (Srirang Barane), श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde), भावना गवळी (Bhavana Gawali), प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav), संजय मंडलिक (Sanjay Mandalik), सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande), राजेंद्र गावित (Rajendra Gavit) उपस्थित होते.

शिंदें ऐवजी माझ्यासोबत चर्चा करा.. उद्धव यांचा फडणवीसांना फोन; मोदी-शाह नॉट रिचेबल

See also  Raju Srivastava Death : कॉमेडीचा बेताज बादशहा 'राजू श्रीवास्तव' काळाच्या पडद्याआड!

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites