Guardian Ministers of Maharashtra : हुश्श! जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले, ‘हे’ असणार तुमचे पालकमंत्री

Guardian Minister of Maharashtra
Share on Social Sites

मुंबई । Mumbai :

शिंदे – फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Government) स्थापन होऊन जवळपास तीन महीने उलटत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet expansion) उशिरा झाल्याने पालकमंत्री लवकरच जाहीर होतील अशी आशा अनेक मंत्र्यांना होती.

मात्र तसे घडलेच नाही. स्वातंत्रदिनाला देखील पालकमंत्री जाहीर झालेले नसतांना ठिकठिकाणी मंत्र्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना उपस्थिती लावावी लागली होती. त्यामुळे जिल्ह्याला पालकमंत्री कोण असणार ? अशी चर्चा सुरू होती आता या चर्चेला आता पूर्णविराम लागणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) हे नागपूर (Nagpur), वर्धा (Wardha), अमरावती (Amravati), अकोला (Akola), भंडारा (Bhandara), गडचिरोली (Gadchiroli) या सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

खरंतर पालकमंत्र्यांची यादी कधी येईल? असा अनेकांकडून प्रश्न उपस्थित केला जात होता. पालकमंत्र्यांच्या यादीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. राज्य सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शिंदे गटाला पालकमंत्रीपदांच्या यादीत तरी जास्त जिल्हे मिळतील, अशी शिंदे गटाच्या आमदारांना आशा होती. पण देवेंद्र फडणवीस यांनाच तब्बल सहा जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आल्याचं चित्र आहे. (List of Guardian Minister of Maharashtra)

राज्य सरकारच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळातील विस्तारात भाजपच्या (BJP) वाटेला महत्त्वाची खाती आली होती. गृह आणि अर्थ खातं भाजपने घेतलं होतं. विशेष म्हणजे फडणवीस यांनी स्वत:कडे ही खाती ठेवली होती.

See also  MVP Election Result : मविप्र संस्थेत महा 'परिवर्तन'; 'प्रगती'चा दणाणून धुव्वा, तब्बल 25 वर्षानंतर खांदेपालट

याशिवाय गृहनिर्माण, ऊर्जा, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास ही सर्व महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली होती. तर मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं ह महत्त्वाचं खातं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पालकमंत्र्यांच्या यादीतही फडणवीस यांच्याचकडे जास्त जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

धुराळा उडणार; राज्यातील 1166 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर, सरपंचपदासाठी थेट निवडणूक

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे :

राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर (Radhakrishna Vikhe Patil – Ahmednagar, Solapur)

सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, गोंदिया (Sudhir Mungantiwar – Chandrapur, Gondia)

चंद्रकांत पाटील – पुणे (Chandrakant Patil – Pune)

विजयकुमार गावित – नंदुरबार (Vijayakumar Gavit – Nandurbar)

गिरीश महाजन – धुळे, लातूर, नांदेड (Girish Mahajan – Dhule, Latur, Nanded)

गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव (Gulabrao Patil – Buldhana, Jalgaon)

दादा भुसे- नाशिक (Dada Bhuse – Nashik)

संजय राठोड – यवतमाळ, वाशिम (Sanjay Rathod – Yavatmal, Washim)

सुरेश खाडे – सांगली (Suresh Khade – Sangli)

संदिपान भुमरे – औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) (Sandipan Bhumre – Aurangabad (Chhatrapati Sambhajinagar)

उदय सामंत – रत्नागिरी, रायगड (Uday Samant – Ratnagiri, Raigad)

तानाजी सावंत – परभणी, उस्मानाबाद (धाराशिव) (Tanaji Sawant – Parbhani, Osmanabad (Dharashiv)

रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग (Ravindra Chavan – Palghar, Sindhudurg)

अब्दुल सत्तार- हिंगोली (Abdul Sattar- Hingoli)

दीपक केसरकर – मुंबई शहर, कोल्हापूर (Deepak Kesarkar – Mumbai City, Kolhapur)

अतुल सावे – जालना, बीड (Atul Save – Jalna, Beed)

शंभूराज देसाई – सातारा, ठाणे (Shambhuraj Desai – Satara, Thane)

मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर (Mangalprabhat Lodha -Mumbai Upnagar)

पालकमंत्र्यांची ही यादी तात्पुरती ?

राज्य सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. राज्यात सत्तांतर होवून तीन महिने झाले आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल? याकडे अनेकांचं लक्ष आहे. राज्यात दुसऱ्या टप्प्यातील विस्तार बाकी होताच पण जिल्ह्यानिहाय पालकमंत्र्यांची देखील यादी जाहीर झालेली नव्हती. त्यामुळे विरोधकांकडून राज्य सरकारवर वारंवार टीका केली जात होती.

पालकमंत्री हा जिल्ह्याचा प्रमुख असतो. जिल्ह्यातील सर्व विकासकामांना निधी मंजूर करण्यापासून ते अनेक महत्त्वाच्या कामांसाठी पालकमंत्र्याची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे सरकार स्थापन होवून तीन महिने झाले तरी पालकमंत्री कधी घोषित होतील? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. ही यादी पुढच्या अडीच वर्षांसाठी जशी आहे तशीच राहण्याची शक्यता कमी आहे. कारण दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार जाहीर झाल्यानंतर नव्या मंत्र्यांनादेखील काही जिल्ह्यांची पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळण्याती शक्यता आहे.

See also  12 तासांमध्ये बदललं राज्याचं राजकारण; नाराज एकनाथ शिंदेंचे ठाकरे सरकारला हे 'तीन' प्रस्ताव, 'इथून' पडली बंडाची ठिणगी

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites