Mulayam Singh Yadav : ‘नेताजी’ गेले! मुलायम सिंह यादव यांचे निधन

Share on Social Sites

गुरुग्राम | Gurugram :

समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह मुलायम सिंह यांचे निधन झाले आहे. सोमवारी सकाळी मेदांता रुग्णालयात (Medanta Hospital) उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांचे वय 82 होते. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) राजकीय वर्तुळात ते ‘नेताजी’ या नावाने प्रसिद्ध होते. (Samajwadi Party leader and former Uttar Pradesh Chief Minister Mulayam Singh Yadav has passed away)

मुलायम सिंह गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांचे कुटुंबिय त्यांना तीन महिन्यांपूर्वीच मेदांता रुग्णालयात घेवून आले होते. मेदांता रुग्णालयात पूर्ण चेकअप केल्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती दि. 02 ऑक्टोबरला सकाळपर्यंत ठीक होती.

मात्र, त्याचदिवशी दुपारी अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने मेदांता रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होते. 55 वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेले मुलायम सिंह यादव यांचा जन्म दि. 22 नोव्हेंबर 1939 रोजी इटावा जिल्ह्यातील सैफई (Saifai in Etawah District) येथे झाला. त्यांनी राज्यशास्त्रात एमए केले.

1967 मध्ये यूपीमधील जसवंत नगरमधून (Jaswant Nagar) आमदार निवडून आल्यानंतर ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मागे वळून पाहिले नाही. ते आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आणि सात वेळा निवडून येऊन लोकसभेचे खासदार झाले. 1996 मध्ये त्यांना संयुक्त आघाडी सरकारमध्ये संरक्षण मंत्री होण्याची संधीही मिळाली.

See also  प्रतीक्षा संपली! KTM RC 390 चे नवीन मॉडेल लाँच; जाणून घ्या किंमत, फिचर्स अन् बरचं काही

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  12 तासांमध्ये बदललं राज्याचं राजकारण; नाराज एकनाथ शिंदेंचे ठाकरे सरकारला हे 'तीन' प्रस्ताव, 'इथून' पडली बंडाची ठिणगी

Share on Social Sites