मुंबई l Mumbai :
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India RBI) मध्य प्रदेश (Madhya Pradesh), महाराष्ट्र (Maharashtra), पश्चिम बंगाल (West Bengal), मणिपूर (Manipur), गुजरात (Gujrat), हिमाचल (Himachal Pradesh) आणि उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्याचील 8 सहकारी बँकांवर 12 लाख रुपयांपेक्षा अधिक दंड आकारला आहे.
या बँकांवर ज्यावर कुणाचा हक्क नाही आहे, अशा ठेवी डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंडमध्ये हस्तांतरित न केल्याचा, फसवणुकीची उशिरा तक्रार केल्याचा आणि असुरक्षित कर्ज मंजूर केल्याचा आरोप आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नबापल्ली सहकारी बँक (Nabapalli Cooperative Bank), बारासात, पश्चिम बंगालवर सर्वात अधिक 4 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याआधी आरबीआयने (RBI) चिनी कंपन्यांसोबत डेटा शेअर केल्याबद्दल फिनटेक फर्म पेटीएमवर (Fitness Farm Paytm) कारवाई केली होती आणि 11 मार्चच्या आदेशानुसार पेटीएम पेमेंट्स बँकेला (Paytm Payments Bank) नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी घातली होती.
आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नांगल आंबियाची हत्या; सामन्या दरम्यान झाडल्या गोळ्या
