
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं आज निधन झालं. (Stock Market investor Rakesh Jhunjhunwala passed away) ते 62 वर्षांचे होते. त्यांना भारतातील वॉरेन बफे (Warren Buffet of India) म्हणूनही ओळखलं जायचं. नुकतीच त्यांनी काही दिवसांपूर्वी आपली एअरलाईन आकासाची (Akasa Airline) सुरूवात केली होती. आकासाच्या पहिल्या मुंबई ते अहमदाबाद प्रवासादरम्यानही ते उपस्थित होते. दि. 7 ऑगस्ट रोजी त्यांच्या कंपनीनं ऑपरेशन्सला सुरूवात केली होती. दि. 13 ऑगस्ट पासून अकासा एअरनं अनेक मार्गांवर आपलं उड्डाण सुरू केलं होतं.
https://twitter.com/ANI/status/1558661708075646978
त्यांची प्रकृती बिघडल्यानं शनिवारी (दि. 13) संध्याकाळी त्यांना मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात (Bridge Candy Hospital, Mumbai) दाखल करण्यात आलं होतं. परंतु अखेर आज (दि. 14) त्यांची प्राणज्योत मावळली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती.
राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala News) यांनी कॉलेजच्या दिवसांपासूनच शेअर बाजारात (Stock Market) गुंतवणूकीची सुरूवात केली होती. सुरूवातीला आपण 100 डॉलर्सची गुंतवणूक केल्याचंही एकदा राकेश झुनझुनवाला यांनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे, त्यावेळी सेन्सेक्स इंडेक्स (Sensex Index) 150 अकांवर होता, जो आता 60 हजारांच्या स्तरावर आहे.
https://twitter.com/MoneycontrolH/status/1558667879796465664
झुनझुनवाला हे एक व्यापारी असून ते सीए’ होते. हंगामा मीडिया आणि अँपटेकचे (Hungama Media and Apptech) ते चेअरमन असून व्हॉईसरॉय हॉटेल्स (Viceroy Hotels), कॉनकॉर्ड बायोटेक (Concorde Biotech), प्रोवोग इंडिया (Provogue India) आणि जिओजित वित्तीय सेवा (Geojit Financial Services) या कंपन्यांच्या संचालकीय मंडळातही त्यांचा समावेश होता.
https://twitter.com/narendramodi/status/1558665063770505216
झुनझुनवाला यांची यशाची कहाणी केवळ 5 हजार रूपयांपासून सुरू होती. आज त्यांचं नेटवर्थ जवळपास 40 हजार कोटी रूपये आहे. त्यांच्या याच यशामुळे त्यांना भारतीय शेअर बाजाराचे बिग बुल (Big Bull of Indian Stock market) असं म्हटलं जातं. झुनझुनवाला यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. गुंतवणूकदारांनी हळहळ व्यक्त केली आहे. ट्वीटरवर दिग्गजांपासून गुंतवणूकदारांपर्यंत सगळ्यांनी श्रद्घांजली अर्पण केली आहे.