आत्महत्या नव्हे हत्याकांड! म्हैसाळमधील ‘त्या’ 9 जणांच्या मृत्यूचा अखेर उलगडा; तपासात धक्कादायक माहिती आली समोर

आत्महत्या नव्हे हत्याकांड! म्हैसाळमधील ‘त्या’ 9 जणांच्या मृत्यूचा अखेर उलगडा; तपासात धक्कादायक माहिती आली समोर l Not suicide but of murder 9 people in Mhaisal Sangli Miraj
आत्महत्या नव्हे हत्याकांड! म्हैसाळमधील ‘त्या’ 9 जणांच्या मृत्यूचा अखेर उलगडा; तपासात धक्कादायक माहिती आली समोर l Not suicide but of murder 9 people in Mhaisal Sangli Miraj
Share on Social Sites

सांगली l Sangli :

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) (Mhaisal, Taluka Miraj) येथील एकाच कुटुंबातील नऊजणांच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला आज सोमवारी (दि. 27) कलाटणी मिळाली. वनमोरे कुटुंबीयांनी आत्महत्या (Vanmore Family Murder case) केली नसून, त्यांना विषारी द्रव्य देऊन त्यांचा खून करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम (Dixit Gedam, Superintendent of Police) यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी सोलापूरच्या (Solapur) दोघांना अटक करण्यात आली असून, गुप्तधनाच्या प्रकरणातून हे हत्याकांड घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आब्बास महंमदअली बागवान (Abbas Mohammad Ali Bagwan) (वय 48, रा. मुस्लीम बाशा पेठ, सरवदेनगर, सोलापूर) व धीरज चंद्रकांत सुरवसे (Dheeraj Chandrakant Survase) (30, रा. वसंतविहार ध्यानेश्वरीनगर, जुना पुना नाका, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

शेवटी झालंच! तब्बल ‘इतक्या’ आमदारांनी मविआचा पाठिंबा काढला; सरकार अल्पमतात, शिंदे गटाचा दावा

म्हैसाळ येथे सोमवार, दि. 20 रोजी विष (poisoning) पिल्याने एकाच कुटुंबातील नऊजणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. सकृतदर्शनी तो सामूहिक आत्महत्येचा प्रकार वाटत होता. संपूर्ण राज्यात या प्रकरणाने खळबळ उडाली होती. मृत्यू झालेल्या वनमोरे कुटुंबातील कोणीही मागे राहिले नसल्याने गूढ वाढले होते.

सावकारांच्या त्रासाला कंटाळून हा प्रकार घडल्याचा निष्कर्ष काढत पोलीसांनी परिसरातील 25 जणांवर गुन्हा दाखल करून 19 जणांना अटक केली होती. पोलीसांचा अधिक तपास सुरू होता. आता आणखी दोन संशयितांना अटक करत त्या आत्महत्या नसून सर्वांचे खून करण्यात आल्याचे अधीक्षक गेडाम यांनी सांगितले.

खान्देश हादरलं! बहिणीची हत्या करुन पहाटे उरकले अंत्यविधी.. साक्री तालुक्यातील खळबळजनक घटना

अटकेतील दोघे मांत्रिकच?

अटक केलेले दोघेही मांत्रिकच असून त्यांनीच गुप्तधनाचे (secret money) आमिष दाखवून वनमोरे कुटुंबाकडून वारंवार पैसे घेतले होते. घटनेच्या आदल्या रात्रीही संशयित म्हैसाळ येथे येऊन गेल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, बागवान व सुरवसे हे दोघे नक्की कोण आणि त्यांनी नऊजणांची हत्या का घडवली याबाबत गेडाम यांनी तपास सुरू असल्याचे सांगत अधिक सांगण्याचे टाळले.

‘या’ नऊजणांचा खून

डॉ. माणिक यल्लाप्पा वनमोरे (Dr. Manik Yallappa Vanamore), रेखा माणिक वनमोरे (Rekha Manik Vanamore), आक्काताई यल्लाप्पा वनमोरे (Akkatai Yallappa Vanamore), आदित्य माणिक वनमोरे (Aditya Manik Vanamore), प्रतिमा माणिक वनमोरे (Pratima Manik Vanamore), शुभम पोपट वनमोरे (Shubham Popat Vanamore), पोपट यल्लाप्पा वनमोरे (Popat Yallappa Vanamore), संगीता पोपट वनमोरे (Sangita Popat Vanamore), अर्चना पोपट वनमोरे (Archana Popat Vanamore) यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Moose Wala Murder : मूसेवाला हत्याकांडातील रेकी करणारा ‘केकडा’ अन् 8 शूटर्सची ओळख पटली, पाहा कोण आहेत?

गुप्तधनाबाबत भेटी

मृत डॉ. माणिक वनमोरे व पोपट वनमोरे या भावांच्या अनोळखी व्यक्तींसोबत गुप्तधनाबाबत भेटी होत होत्या. यासाठी वेळोवेळी त्यांनी त्या व्यक्तिंना पैसेही दिले होते. त्या व्यक्ती रात्री वनमोरे यांच्या घरीही येत होत्या, अशी माहिती मिळाली. त्यानुसार तपास करत पोलीसांनी सोलापूर येथील दोघांना अटक केली.

जेवणातून देण्यात आले विष (Poison was given from the meal)

नऊ जणांच्या मृत्यूचे कोडे उलगडताना विषारी द्रव्य देऊन त्यांचा दोघांनी खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. दि. 19 रोजी रात्री वनमोरे कुटुंबाला जेवणातूनच हे विष देण्यात आल्याची शक्यता असून, संशयितांकडून घटनाक्रम जाणून घेतला जात आहे. यानंतर याची माहिती देऊ, असे अधीक्षक गेडाम यांनी सांगितले.

अन्य सावकारांचा शोध सुरू

वनमोरे कुटुंबातील नऊजणांच्या मृत्यूनंतर केलेल्या तपासात सावकारांकडूनही त्रास देण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील 19 जणांना अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित सहाजणांचा शोध सुरू असल्याचे अधीक्षकांनी सांगितले.

…म्हणून ‘त्याने’ रचला उद्योजक आहेर यांचा हत्येचा कट; नाशिक पोलीस आयुक्तांनी केला खुनाचा उलगडा

See also  रशिया-युक्रेन युद्धाचा जबर फटका; सेन्सेक्स 16400 अंकांनी गडगडला, विक्रीचे सत्र सुरूच

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  हृदयद्रावक! ५ दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू; आईचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह : डॉक्टरही हादरले

Share on Social Sites