“मुबारक हो, मुंबई मे हमला होनेवाला है”; पोलीसांच्या WhatsApp वर धमकीचा मेसेज

Mumbai Police Receive '26/11 Style' Attack Threat
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

“जी मुबारक हो, मुंबई मे हमला होने वाला है 26/11 की नई ताजी याद दिलाएगा” असा मेसेज मुंबई वाहतूक पोलीसांच्या नियंत्रण कक्षाला (Mumbai Traffic Police) शनिवारी (दि. 20) रात्री आला आहे. त्यामुळे सर्व पोलीस ठाणे व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. (Mumbai Police probing “26/11 style” attack threat it received from Pakistan phone number)

पोलीस ट्रॅफिक कंट्रोलला शनिवारी 26/11 प्रमाणे हल्ल्याची धमकी रात्री 11च्या सुमारास मिळाली अशी माहिती आहे. मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाच्या व्हॉट्सअँपवर (WhatsApp) पाकिस्तानी (Pakistan) नंबरवरून धमकीचा संदेश पाठवण्यात आला होता. त्याचे ‘लोकेशन ट्रेस’ (Location Trace) केल्यास ते भारताबाहेर असल्याचे आढळून येईल, असे मेसेंजरने सांगितले होते. मुंबईत हल्ला होईल, अशी धमकी संदेशवाहकाने दिली.

धमकीच्या संदेशात असेही म्हटले आहे की, 6 लोक ही योजना भारतात राबवतील. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात शस्त्रास्त्रे आणि स्फोटके घेऊन जाणारी एक बोट जप्त केल्यानंतर दोन दिवसांनी ही धमकी आली आहे. 2008 मध्ये मुंबईवरील हल्ला ही दहशतवादी मालिका होती. (Mumbai Attack Plan)

See also  शेवटी झालंच! तब्बल 'इतक्या' आमदारांनी मविआचा पाठिंबा काढला; सरकार अल्पमतात, शिंदे गटाचा दावा

26 नोव्हेंबर 2008 रोजी सुरू झालेले हल्ले ज्यात लष्कर-ए-तैयबा या पाकिस्तानी इस्लामी दहशतवादी संघटनेच्या (Pakistani Islamist terrorist group Lashkar-e-Taiba) 10 सदस्यांनी चार दिवसांच्या कालावधीत मुंबईत 12 ठिकाणी गोळीबार आणि बॉम्बस्फोट हल्ले केले होते. हा तपास वाहतूक पोलीसांकडून गुन्हे प्रकटीकरण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार याबाबत तपास सुरू आहे.

धमकी नहीं, हकीकत में आयेंगे! (Damaki nahi, Hakikat Me Ayenge)

“जी मुबारक हो मुंबई मे हमला होने वाला है, 26/11 की नई ताजी याद दिलाएगा” असे म्हणत काही काँटॅक्ट क्रमांक शेअर करण्यात आले आहेत. पुढे “मुंबई को उडाने की तैयारी कर रहे है”, युपी एटीएस (UP ATS) करवाना चाहती है मुंबई उडाना, मै पाकिस्तान से ,आपके कुछ इंडियन्स मेरे साथ है, जो मुंबई कोडवाना चाहीये, और ये धमकी नही आयेंगे हकीकत मे हो, मेरा लोकेशन यहा का ऍड्रेस करेगा लेकिन काम मुंबई मे चलेगा, हम लोगों का कोई ठिकाना नही होता, लोकेशन आपको आऊट ऑफ कंट्री ट्रेस होगा, हमला 26/11 मुंबई मे होगा, मैने पेहले इसलिये आप से इंडिया का के नंबर आपको दे दिजिए, उदयपुर (Udaipur) जैसा भी कांड हो सकता है तन से जुदा जूदा सर (Tan se Juda Sar), Ok याद होगा पंजाब का सिधू मुझसेवाला (Sidhu moosewala) एस तरह की भी हरकत हो, कुछ भी हो अमेरिका (America) का भी हम ना याद होगा तारीख आपको दू, अगर एक हो सामा, एक अजमल कसाब (Ajmal Kasab) एक आई वॉन्ट ऑल जवारी मर गया तो, काफी ऑल जवारी ल भारी है, Ok.. असे या मेसेंजरने वाहतूक पोलीसांना लिहिले आहे.

See also  पेपरफुटीचे सत्र सुरूच : Vehicle Mechanic पदाच्या भरती परीक्षेचा पेपर फुटला; BRO चे सहसंचालकांना अटक

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  JEE Main Result 2022 : जेईई मेन 2022 चा निकाल जाहीर; एकूण 24 उमेदवारांना 100% गुण

Share on Social Sites