Pradeep Patwardhan death : मराठी चित्रपटसृष्टीमधील तारा निखळला; ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड

Pradeep Patwardhan passes away
Share on Social Sites

मुंबई । Mumbai :

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं आहे. (Pradeep Patwardhan death news) प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘मोरुची मावशी’ (Moruchi Mavashi) हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती. (Marathi Veteran Actor Pradeep Patwardhan passes away)

https://twitter.com/mr_digital02/status/1556858290562162689

माहितीनुसार, प्रदीप पटवर्धन हे गिरगावात (Girgaon) स्थायिक होते. त्यांनी कॉलेज काळापासूनच एकांकिका स्पर्धेत काम केले होते. त्यानंतर कालांतराने ते व्यावसायिक नाटकाकडे वळले. मराठी रंगभूमीवरील एक अतिशय विनोदी कलाकार म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांचे अनेक चित्रपट आणि मालिका आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. मोरुची मावशी हे त्यांचं नाटक खूप गाजलं.

याशिवाय त्यांनी नवरा माझा नवसाचा (Navra Mazha Navsacha), चश्मे बहाद्दर (Chashme Bahaddar), एक दोन तीन चार (Ek Doon Tin Char), लावू का लाथ (Lavau Ka Lath), भुताळलेला (Bhutallela), नवरा माझा भवरा (Navra Mazha Bhavara), डोम (Dom), मी शिवाजी राजे भोसले बोलतोय (Mee Shivaji Raje Bhosle Boltoy), जमलं हो जमलं (Jamal Ho Jamal), एक शोध (Ek Shodh) अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

See also  World Menstrual Hygiene Day 2022 : मासिक पाळीदरम्यान ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी, 28 मे राेजीच का साजरा केला जातो 'हा' दिन?; वाचा सविस्तर...
See also  चिंता वाढली! भारतात Corona च्या नव्या व्हेरिअंटची एन्ट्री, मुंबईत XE आणि कप्पाची पहिली केस

Share on Social Sites