
नाशिक | Nashik (ई खबरबात न्यूज नेटवर्क) :
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणूका (MVP Election Result 2022) गेल्या अनेक दिवसांपासून चांगल्याच चर्चेत होत्या. आता या निवडणूकीच्या निकालाचे कल स्पष्ट झाले आहेत. मराठा विद्या प्रसारक समाज संस्था ही राज्यातील दोन नंबरची मोठी संस्था असल्याने संपूर्ण राज्याचा नजरा या निवडणूकीकडे लागून होत्या.
ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाल्याचे बघायला मिळाले असून यात दिग्गज प्रस्थापितांना मोठा धक्का या निवडणूकीमध्ये बसला आहे. परिवर्तन पॅनलची (Parivartan Panel) सरशी या निवडणूकीमध्ये दिसून आली. या निवडणूकीचा अतिशय धक्कादायक निकाल आला आहे. नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या (Nashik District Maratha Vidyaprasarak Samaj Sanstha, Nashik) पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी काल (दि. 29) रात्री उशिरा पर्यंत सुरु होती.
अखेर तब्बल 20 वर्षांनंतर संस्थेत खांदेपालट झाली आहे. या निवडणुकीत परिवर्तन पॅनलची (Parivartan Panel) सरशी झाली असून प्रगती पॅनलचा (Pragati Panel) धुव्वा उडाला आहे. (Maratha Vidya Prasarak Samaj Sansthan Election Result 2022)
सरचिटणीस नीलिमा पवार यांचा दणाणून पराभव (General Secretary Neelima Pawar lost election)
या निवडणूकीमध्ये सत्ताधारी पॅनलचे अध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील ढिकले (Sunil Dhikle) यांचा विजय झाला आहे. आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) यांचा पराभव करत सुनील ढिकले यांचा देखील विजय झाला. ढिकले हे भाजप आमदार राहुल ढिकले (BJP MLA Rahul Dhikle) यांचे बंधू आहेत. यामुळे भाजपाचा ढिकले यांना या निवडणूकीमध्ये सपोर्ट असल्याचे सांगितले जात होते. मात्र, सरचिटणीस नीलिमा पवार (Neelima Pawar) यांचा दारून पराभव या निवडणूकीमध्ये झाल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे.
सरचिटणीपदाच्या मतमोजणीला रात्री अधिक उशीर झाला. यात परिवर्तन पॅनलचे अँड. नितीन बाबूराव ठाकरे (Adv. Nitin Baburao Thackeray) यांना 5,396 मते मिळाली तर प्रगतीच्या निलिमा पवार यांना फक्त 4,135 मते मिळाली. अँड. ठाकरे यांचा 1261 मतांनी दणदणीत विजय झाला.
निवडणुकीतील विजयी उमेदवार खालील प्रमाणे :
सरचिटणीस पद :
अँड. नितीन बाबूराव ठाकरे (परिवर्तन पॅनल) : विजयी (मिळालेली मते : 5396)
नीलिमा वसंतराव पवार (प्रगती पॅनल)
चिटणीस पद :
दळवी दिलीप सखाराम (परिवर्तन पॅनल) : विजयी (मिळालेली मते-5146)
पाटील प्रशांत वसंतराव (प्रगती पॅनल)
अध्यक्ष पद :
डॉ. ढिकले सुनिल उत्तमराव (प्रगती पॅनल) : विजयी (मिळालेली मते : 4937)
कोकाटे माणिकराव शिवाजीराव (अध्यक्ष)
उपाध्यक्ष पद :
मोरे विश्वास बापूराव (परिवर्तन पॅनल) : विजयी (मिळालेली मते : 4968)
मोरे दिलीपराव तुकाराम (प्रगती पॅनल)
सभापदी पद :
क्षीरसागर बाळासाहेब रामनाथ (परिवर्तन पॅनल) : विजयी (मिळालेली मते : 5225)
माणिकराव माधवराव बोरस्ते (प्रगती पॅनल)
उपसभापती पद :
मोगल देवराम बाबूराव (परिवर्तन पॅनल) : विजयी (मिळालेली मते : 5042)
……………………
तालुका प्रतिनिधी
लांडगे लक्ष्मण फकिरा (परिवर्तन पॅनल) : विजयी
नानासाहेब महाले प्रगती
नाशिक ग्रामीण (Nashik Rural) :
पिंगळे रमेश पांडुरंग (परिवर्तन पॅनल) : विजयी
पिंगळे सचिन पंडितराव (प्रगती पॅनल)
येवला (Yeola) :
बनकर नंदकुमार बालाजी (परिवर्तन पॅनल) : विजयी
शिंदे माणिकराव माधवराव (प्रगती पॅनल)
सिन्नर (Sinnar) :
भगत कृष्णाची गणपत (परिवर्तन पॅनल) : विजयी
हेमंत विठ्ठलराव वाजे (प्रगती पॅनल)
मालेगाव (Malegaon) :
अँड. बच्छाव रमेशचंद्र काशिनाथ (परिवर्तन पॅनल) : विजयी
डॉ. जयंत पवार (प्रगती पॅनल)
देवळा (Deola) :
पगार विजय पोपटराव (परिवर्तन पॅनल) : विजयी
केदाजी नानाजी आहेर (प्रगती पॅनल)
चांदवड (Chandwad) :
डॉ. गायकवाड सयाजीराव नारायणराव (परिवर्तन पॅनल) : विजयी
उत्तमबाबा भालेराव (प्रगती पॅनल)
नांदगाव (Nandgaon) :
(पाटील) बोरसे अमित उमेदसिंग (परिवर्तन पॅनल) : विजयी
चेतन मनसुखराव पाटील (प्रगती पॅनल)
सटाणा (Satana) :
प्रसाद सोनवणे (परिवर्तन पॅनल) : विजयी
विशाल सोनवणे (प्रगती पॅनल)
निफाड (Niphad) :
गडाख शिवाजी जयराम (परिवर्तन पॅनल) : विजयी
दत्तात्रय निवृत्ती गडाख (प्रगती पॅनल)
दिंडोरी (Dindori) :
जाधव प्रविण एकनाथ (परिवर्तन पॅनल) : विजयी
सुरेश कळमकर (प्रगती)
कळवण (Dindori) :
देवरे रवींद्र शंकर (परिवर्तन पॅनल) : विजयी
धनजंय पवार (प्रगती पॅनल)
इगतपुरी (Igatpuri) :
गुळवे संदीप गोपाळराव (परिवर्तन पॅनल) विजयी
खताळे भाऊसाहेब (प्रगती पॅनल)
सेवक संचालक :
संजय खंडेराव शिंदे – (सेवक) : विजयी
डॉ. संपराव काळे
इंद्रजित दयाराम शिंदे – (सेवक) विजयी
रामराव बच्छाव
जगन्नाथ मधुकर निंबाळकर – (सेवक) विजयी
राजेश शिंदे
महिला राखीव गट :
बोरस्ते शोभा भागवत (विजयी)- परिवर्तन पॅनल
सोनवणे शालन अरुण (विजयी)- परिवर्तन पॅनल
सिंधुताई मोहनराव आढाव
सरला गुलाबराव कापडणीस