येत्या 01 ऑगस्टपासून ‘हे’ नियम बदलणार; बघा, तुमच्यावर नेमका काय परिणाम होणार?

Many rules will change from 01 August 2022 Check details
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

ऑगस्ट तसा तर क्रांतीचा महिना. देशाने या क्रांतीपर्वातच स्वातंत्र्य मिळवलं आणि गेल्या 75 वर्षांपासून देश ते स्वातंत्र्य उपभोगत आहेत. गेल्याकाही महिन्यांत देशातील नियमात, कायद्यात अनेक बदल झाले आहेत. आता दि. 01 ऑगस्टपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमत (LPG gas Cylinder new rule) नव्याने ठरवण्यात येणार आहे. तर ऑगस्ट महिन्यांत भरमसाठ सुट्यांचा पाडाव (Bank Holidays in August) आहे. या महिन्यांत अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. एवढेच नाही तर बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda BOB) त्यांच्या धनादेशाविषयीच्या नियमात बदल करणार आहे. या

तसेच बँका व्यवहाराच्या (Cash Transaction) नियमांत काही बदल करण्याची शक्यता आहे. या बदलांचा तुमच्या जीवनावर परिणाम होणार आहे. घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या तर तुमचा खिसा खाली होईल तर कमी झाल्या तर तुम्हाला फायदा होईल. तसेच तुम्ही बँक ऑफ बडोद्याचे ग्राहक असाल तर धनादेशाविषयीचे नियम माहिती असणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. तसेच सुट्यांच्या दिवशी बँकेत जाण्याचे परिश्रम ही बातमी वाचल्यावर टळतील…

धनादेशाचे काय बदलले नियम (Bank cheques rules changes?)

दि. 01 ऑगस्टपासून बँक ऑफ बडोद्याचे (BOB) धनादेशाचे नियम बदलले जातील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank of India RBI) मार्गदर्शक सूचनांचे पालन बँक करणार आहे. बँक ऑफ बडोद्याने त्याअनुषंगाने धनादेश व्यवहारांचा नियम बदलणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेपासून पाच लाख रुपयांच्या वरील आर्थिक व्यवहारांसाठी बँकेने पॉझिटिव्ह पे सिस्टिम (Bank Positive Pay System) लागू केली आहे. धनादेश देणाऱ्याला बँक आता धनादेश व्यवहाराची विषयीची अद्ययावत माहिती एसएमएस, नेटबँकिंग, मोबाईल अँपद्वारे देईल. त्यामुळे धनादेश व्यवहाराच्या फसवणुकीचे प्रकार होणार नाही.

काय आहे ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’ ? (What is Bank Positive Pay System?)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेतील फसवणूक टाळण्यासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टिम लागू केली आहे. फसवणूक रोखण्यासाठी 2020 पासून धनादेशासाठी केंद्रीय बँकेने ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’ सुरु केली आहे. या सिस्टिममुळे 50,000 आणि त्यावरील अधिकच्या पेमेंटसाठी नुकसान टाळण्यास येणार आहे. सिस्टिमनुसार, एसएमएस (SMS), बँकेचे मोबाईल अँँप वा एटीएमद्वारे धनादेश देणाऱ्या व्यक्तीला धनादेशाविषयीची माहिती बँकेला द्यावी लागणार आहे. धनादेशाविषयी ही माहिती तपासली जाते. सर्व माहिती योग्य वाटल्यावरच धनादेशाची पुढील प्रक्रिया पूर्ण करता येते.

घरगुती गॅसच्या किंमती बदलणार (Domestic gas prices will change)

दर महिन्याच्या एक तारखेला घरगुती गॅसच्या किंमती ठरवण्यात येतात. ऑगस्ट महिन्याच्या एक तारखेपासून हे भाव कमी जास्त होऊ शकतात. सरकारी तेल उत्पादक कंपन्या गॅस सिलिंडरच्या किंमती ठरवतात. गेल्यावेळेप्रमाणेच यावेळी सुद्धा गॅसच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

तब्बल 18 दिवस बँका बंद! (Banks closed for 18 days In August)

ऑगस्ट महिन्यात एकूण 18 दिवस बँकेला ताळे राहणार आहे. या दिवशी बँक बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ऑगस्ट महिन्यातील सुट्यांची यादी जाहीर केली आहे. ऑगस्ट महिन्यात मोहरम (Muharram), रक्षाबंधन (Raksha Bandhan), स्वातंत्र्य दिन (Independence Day), कृष्ण जन्माष्टमी (Janmashtami) आणि गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) असे महत्वाचे सण आहेत. यादिवशी बँकेचे कामकाज बंद असेल. याशिवाय दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी (Saturday) तसेच रविवारी (Sunday) साप्ताहिक सुट्टी असल्याने बँकांचे शटर डाऊन असेल. सगळ्या प्रकारच्या सुट्यांचा विचार करता, ऑगस्ट महिन्यांत बँकांना तब्बल 18 दिवस सुट्ट्या असतील.

See also  28 ची नवरी, 41 चा नवरदेव, दोघात 13 वर्षाचं अंतर जास्त नाही?, IAS Tina Dabi ने सांगितली त्रिसूत्री

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  देशातली पहिली BSL-3 लॅब नाशिकमध्ये; २५ कोटी खर्चून निर्मिती, काय काम, महामारीत महत्त्व कसे?

Share on Social Sites