काँग्रेसमध्ये आता ‘खर्गे पर्व’; 24 वर्षांनंतर मिळाला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष

new president of Congress Party
Share on Social Sites

नवी दिल्ली । New Delhi :

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Congress Presidential Elections) मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी मोठ्या फरकाने थरूर यांचा पराभव केला आहे. तर निवडणुकीत 416 मतं बाद करण्यात आली आहे.

शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी खरगे यांचे अभिनंदन केले आहे. मल्लिकार्जुन खरगे हे निवडणूक जिंकणार असा दावा निवडणुकीपूर्वीपासूनच केला जात होता. खरगे हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय आणि विश्वासू नेते आहे.

80 वर्षांचे खरगे हे कर्नाटकातील (Karnataka) आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा आधीच राजीनामा दिला आहे. निवडणुकीत 7 हजार 897 मतं मिळवून खरगे विजयी झाले. तर थरूर यांना 1 हजार 72 मतं मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेल्या 24 वर्षांमध्ये प्रथमच झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोमवारी 96 टक्के मतदान झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात अध्यक्षपदाची सरळ लढत होती. काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण? हे आज झालेल्या मतमोजणीअंती स्पष्ट झाले.

गेल्या सात आठवड्यांपासून हा चर्चेचा विषय ठरला होता. या निवडणुकीत देशातील 36 केंद्रे आणि 68 मतदान केंद्रांवर सकाळी 10 पासून सायंकाळी 4 पर्यंत 9 हजार 915 पैकी 9500 हून अधिक प्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला होता.

See also  १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपीला अखेर अटक

काँग्रेस नेत्या सोनिया गांधींसह (Congress leader Sonia Gandhi) माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Former Prime Minister Dr. Manmohan Singh), काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा (Congress National General Secretary Priyanka Gandhi-Vadra), राहुल गांधी (Rahul Gandhi), माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम (Former Union Finance Minister P. Chidambaram), प्रचार विभागाचे प्रमुख जयराम रमेश (Head of Campaign Jairam Ramesh) आणि अजय माकन (Ajay Maken) यांनी आणि इतर प्रमुख नेत्यांनी मतदान केले होते.

137 वर्षांतील सहावी निवडणूक

– काँग्रेस पक्षाच्या 137 वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपदासाठी झालेली ही सहावी निवडणूक

– यापूर्वी, 1939, 1950, 1977, 1997 आणि 2000 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणुका

– स्वातंत्र्योत्तर काळात 1977 साली काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी पहिल्यांदा निवडणूक झाली. यात के. ब्रह्मानंद रेड्डी (K. Brahmananda Reddy) यांच्याकडून सिद्धार्थ शंकर रे (Siddharth Shankar Ray) आणि डॉ. करण सिंह (Dr. Karan Singh) यांचा पराभव

– 1997 साली सीताराम केसरी (Sitaram Kesari) यांचा शरद पवार (Sharad Pawar) व राजेश पायलट (Rajesh Pilot) यांच्यावर विजय

– 2000 मध्ये सोनिया गांधी यांच्या उमेदवारीला जितीन प्रसाद (Jitin Prasad) यांचे आव्हान

कोण आहेत मल्लिकार्जुन खरगे? (Who is Mallikarjun Kharge?)

  • मल्लिकार्जुन खरगे यांचा जन्म दि. 12 जुलै 1942 चा
  • विद्यार्थी संघटनेचा नेता आणि मग राजकारणात प्रवेश
  • काँग्रेस पक्षातील एक मोठा दलित चेहरा
  • कर्नाटकातील मजुरांच्या हक्काची लढाई आणि आंदोलनांचे नेतृत्व
  • 1972 मध्ये पहिल्यांदाच आमदार झाले
  • 2008 पर्यंत सतत 9 वेळा आमदार म्हणून विधिमंडळात निवडून गेले
  • 2009 आणि 2014 असे दोन वेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडणून गेले
  • मनमोहनसिंह सरकारमध्ये श्रममंत्री
  • उत्कृष्ट कबड्डी आणि फुटबॉल खेळाडू
  • चांगले वक्ते, लोकसभा आणि राज्यसभेत दमदार भाषण करण्याची क्षमता
See also  बापरे! 15 दिवसांत 3 बंगाली अभिनेत्रींची आत्महत्या, नेमकं काय घडलं?

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  Corona Vaccine : आता २ ते ६ वर्षांच्या मुलांना लवकरच मिळणार Corona ची लस

Share on Social Sites