Maharashtra Cabinet Expansion : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; जाणून घ्या.. कोणत्या मंत्र्यांना मिळाली कोणती खाते

Guardian Minister of Maharashtra
Share on Social Sites

मुंबई | Mumbai :

राज्य मंत्रिमंडळाचं अखेर खातेवाटप जाहीर झालं आहे. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Sarkar) स्थापन होवून 40 दिवस उलटल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. त्यानंतर आठवडा उलटल्यानंतरही खातेवाटप जाहीर करण्यात आलं नव्हतं. (Maharashtra Cabinet account allocation announced for Ministers)

खातेवाटपाच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून सरकारवर (Shinde-Fadanvis Sarkar) वारंवार ताशेरे ओढले जात होते. अखेर आज (दि. 14) मंत्रिमंडळासाठी खातेवाटप जाहीर झालं आहे. विशेष म्हणजे, या मंत्रिमंडळात भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (BJP leader Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर मोठी जबाबादारी सोपवण्यात आली आहे. त्यांना महसूल विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास (Urban Development), माहिती व तंत्रज्ञान (Information and Technology), माहिती व जनसंपर्क (Information and Public Relation), सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प) (Public Works), परिवहन (Transport), पणन (Marketing), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य (Social Justice and Special Assistance), मदत व पुनर्वसन (Relief and Rehabilitation), आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management), मृद व जलसंधारण (Soil and Water Conservation), पर्यावरण व वातावरणीय बदल (Environment and Climate Change), अल्पसंख्याक व औकाफ (Minorities and Auqaf) तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्याकडे गृह (Home), वित्त व नियोजन (Finance and Planning), विधी व न्याय (Law and Justice), जलसंपदा व लाभक्षेत्र विकास (Water resources and Benefits sector development), गृहनिर्माण (housing), ऊर्जा (Energy), राजशिष्टाचार (Royal etiquette) ही खाती असतील. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर (Governor Bhagat Singh Koshyari) हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत :

  1.  राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास (Radhakrishna Vikhe-Patil – Revenue, Animal Husbandry and Dairy Development)
  2. सुधीर मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय (Sudhir Mungantiwar – Forestry, Cultural Affairs, and Fisheries)
  3. चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य (Chandrakant Patil – Higher and Technical Education, Textile Industry and Parliamentary Affairs)
  4. डॉ. विजयकुमार गावित – आदिवासी विकास (Dr. Vijayakumar Village – Tribal Development)
  5. गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण (Girish Mahajan- Village Development and Panchayati Raj, Medical Education, Sports and Youth Welfare)
  6. गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता (Gulabrao Patil- Water Supply and Sanitation)
  7. दादा भुसे- बंदरे व खनिकर्म (Dada Bhuse – ports and mining)
  8. संजय राठोड – अन्न व औषध प्रशासन (Sanjay Rathore – Food and Drug Administration)
  9. सुरेश खाडे – कामगार (Suresh Khade – Labourer)
  10. संदीपान भुमरे – रोजगार हमी योजना व फलोत्पादन (Sandipan Bhumre – Employment Guarantee Scheme and Horticulture)
  11. उदय सामंत – उद्योग (Uday Samant – Industry)
  12. प्रा. तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण (Prof. Tanaji Sawant- Public Health and Family Welfare)
  13. रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण (Ravindra Chavan – Public Works (excluding Public Enterprises), Food and Civil Supplies and Consumer Protection)
  14. अब्दुल सत्तार – कृषी (Abdul Sattar – Agriculture)
  15. दीपक केसरकर – शालेय शिक्षण व मराठी भाषा (Deepak Kesarkar – School Education and Marathi Language)
  16. अतुल सावे – सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण (Atul Save – Cooperation, Other Backward and Bahujan Welfare)
  17. शंभूराज देसाई – राज्य उत्पादन शुल्क (Shambhuraj Desai – State Excise)
  18. मंगलप्रभात लोढा – पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास (Mangalprabhat Lodha – Tourism, Skill Development and Entrepreneurship, Women and Child Development)
See also  WWE शोकसागरात! ‘या’ दिग्गज रेसलरचे निधन; ३ वेळा आला होता 'हार्ट अटॅक'

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  🚍 ST संपाचा तिढा अखेर सुटला!; हायकोर्टाने दिले 'हे' आदेश

Share on Social Sites