एकनाथ शिंदे (Eknath Shinde rebel) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) मोठी बंडाळी केल्यानंतर भाजपसोबत (BJP) युती करत राज्यात सरकार स्थापन केले. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) मात्र, गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण राज्याला प्रतीक्षित असलेल्या शिंदे गट (Shinde group) आणि भाजपचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज (दि. 09) 39व्या दिवशी पार पडला.
भाजपकडून दिग्गज नेत्यांना संधी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडून मात्र ठाकरे पॅटर्न राबवण्यात आला असून ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातीलच बहुतेक नेत्यांना संधी देण्यात आली आहे. फक्त तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे एक नाव शिंदेंच्या मंत्रिमंडळात नवीन आहे. इतर सर्व हे ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत. आज एकूण 18 जण मंत्रिपदाची शपथ घेतली.
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाची वैशिष्ट्ये (Shinde-Fadnavis Cabinet)
- आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात सर्व 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. (18 MLAs took oath as cabinet ministers Maharashtra)
- भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी पहिली शपथ घेतली, तर शिंदे गटातून पहिल्यांदा शपथ घेण्याचा मान गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना मिळाला
- विशेष म्हणजे, या मंत्रिमंडळात एकाही महिला नेत्याचा समावेश नाही. ‘पुरुषप्रधान मंत्रिमंडळ’ असा उल्लेख शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा करता येईल.
- तर शिंदे गटातील आक्रमक चेहरा संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा पत्ता कट झाला असून मागे पडलेलं अब्दुल सत्तारांचं (Abdul Sattar) नाव ऐनवेळी आघाडीवर आलं.
- भाजपच्या आरोपामुळे मंत्रिपद गमावलेल्या संजय राठोडांना (Sanjay Rathore) पुन्हा मंत्रिपदाचा मान
पहिली संधी राधाकृष्ण विखे पाटलांना
भाजपकडून 9 दिग्गजांना संधी देण्यात आली. भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिली मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil), भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन (Girish Mahajan), नंदुरबारमधील भाजप नेते विजयकुमार गावित (Nandurbar BJP leader Vijaykumar Gavit) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिंदे गटाकडून पहिली शपथ ही आमदार गुलाबराव पाटील (MLA Gulabrao Patil) यांनी घेतली. त्यानंतर मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आमदार दादा भुसे (MLA of Malegaon outer constituency Dada Bhuse) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
Maharashtra State Cabinet:
Shri #RadhaKrishnaVikhePatil swears -in as the Cabinet Minister in the Maharashtra State Cabinet.
The Governor, Shri @BSKoshyari administered the oath of office and secrecy. The event was held at Darbar Hall, Raj Bhavan. pic.twitter.com/WzhbUOYGjZ
— MAHA INFO CENTRE (@micnewdelhi) August 9, 2022
सांगलीतील मिरजचे भाजपचे आमदार सुरेश खाडे (Suresh Khade, BJP MLA from Miraj in Sangli) यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिंदे गटाचे पैठण मतदारसंघाचे आमदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre MLA of Paithan Constituency), रत्नागिरी मतदारसंघाचे आमदार उदय सामंत (Uday Samant MLA of Ratnagiri Constituency), उस्मानाबादच्या परांडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant MLA of Paranda Constituency of Osmanabad) यांनी शपथ घेतली. डोंबिवलीमधील भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan, BJP MLA, Dombivli) यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ घेतली.
त्यापाठोपाठ शिंदे गटातील औरंगाबादच्या सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar, MLA of Sillod Constituency of Aurangabad), सिंधुदुर्गमधील सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar, MLA of Sawantwadi Constituency in Sindhudurg) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर भाजपचे औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल सावे (Aurangabad East Constituency MLA Atul Save) यांनी शपथ घेतली. तर, शिंदे गटातील सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघाचे आमदार शंभुराज देसाई (MLA Shambhuraj Desai of Patan constituency in Satara district) यांनीही शपथ घेतली. त्यानंतर भाजपचे मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha BJP) यांनी शपथ घेतली. हे सर्व मंत्री कॅबिनेट मंत्री होणार असल्याची माहिती आहे.
राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे. @mieknathshinde @Dev_Fadnavis
— Supriya Sule (@supriya_sule) August 9, 2022
21 जिल्ह्यांना मंत्रिपद एकही नाही
36 पैकी 21 जिल्ह्यात एकही मंत्रिपद नाही. एका जिल्ह्यात दोन मंत्रिपदं तर एका जिल्ह्यात तर तीन मंत्रिपदं, जळगावात (Jalgaon) दोन मंत्री आणि औरंगाबादला (Aurangabad) तीन मंत्रिपदं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह आता शिंदे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकूण 20 मंत्री आहेत. त्यात 18 नवनिर्वाचीत मंत्र्यांचा शपथविधी राजभवनात (Raj Bhavan) पार पडला. दरम्यान, एकही मंत्रिपद वाट्याला न आलेल्या जिल्यांची संख्या 21 असून एकूण उर्वरीत 15 जिल्ह्याच्या वाट्याला किमान एकतरी मंत्रिपद आले आहे.
औरंगाबाद, जळगाववर कृपादृष्टी
विशेष म्हणजे, 15 पैकी दोन जिल्ह्यांवर शिंदे-फडणवीस सरकार मेहेरबान असल्याचे आता झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारातही दिसून आले. यामध्ये औरंगाबाद (Aurangabad) आणि जळगाव (Jalgaon) या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या तीन आमदारांना मंत्रिपद देण्यात आले आहे. या भाजपने औरंगाबादमधील अतुल सावे (Atul Save) यांना मंत्रिपद दिले असून शिंदे गटाकडून अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि संदीपान भुमरे (Sandip Bhumare) यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागलीय. जळगावातही दोन मंत्रिपदे देण्यात आलीत. गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि गुलाबराव पाटील (Gulabraon Patil) अशा दोघांनाही मंत्रिपदं बहाल करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या सर्व नवनियुक्त मंत्र्यांचे हार्दिक अभिनंदन! 💐 pic.twitter.com/YefkxpqDWK
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 9, 2022
राठोडांच्या मंत्रिपदावरून चित्रा वाघ संतप्त (Chitra Wagh angry over Rathore’s ministry)
पूजा चव्हाण (Pooja Chavan Murder) आत्महत्या प्रकरणामुळे संजय राठोड (Sanjay Rathode) यांना आपल्या वनमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. पण आज शिंदे गटाकडून पुन्हा एकदा संजय राठोड यांना मंत्रिपद बहाल करण्यात आले आहे. संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आल्यामुळे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राठोडना पुन्हा मंत्रीपद दिले जाणे हे अत्यंत दुदैवी आहे. राठोड पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूच ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. लडेंगे, जितेंगे, अशी संतप्त प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.
पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे
संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे
माझा न्याय देवतेवर विश्वास
लडेंगे….जितेंगे 👍 @CMOMaharashtra pic.twitter.com/epJCMpvHLB— Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) August 9, 2022
शिंदे गटातील मंत्री (Ministers from the Shinde group)
- गुलाबराव पाटील (कॅबिनेट)
- दादा भुसे (कॅबिनेट)
- संजय राठोड (कॅबिनेट)
- संदीपान भुमरे (कॅबिनेट)
- उदय सामंत (कॅबिनेट)
- तानाजी सावंत (कॅबिनेट)
- अब्दुल सत्तार (कॅबिनेट)
- दीपक केसरकर (कॅबिनेट)
- शंभूराज देसाई (कॅबिनेट)
महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून आज ज्यांनी शपथ घेतली त्या सर्वांचे अभिनंदन. प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती यांचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम आहे. राज्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा.
— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2022
भाजपतील मंत्री (Minister in BJP)
- राधाकृष्ण विखे पाटील (कॅबिनेट)
- सुधीर मुनगंटीवार (कॅबिनेट)
- चंद्रकांत पाटील (कॅबिनेट)
- विजयकुमार गावित (कॅबिनेट)
- गिरीश महाजन (कॅबिनेट)
- सुरेश खाडे (कॅबिनेट)
- रवींद्र चव्हाण (कॅबिनेट)
- अतुल सावे (कॅबिनेट)
- मंगलप्रभात लोढा (कॅबिनेट)