महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. (SSC HSC exams 2023 exam Time Table, Standard 10th and 12th exam schedule announced)
त्यानुसार बारावीची परीक्षा दि. 21 फेब्रुवारीला, तर दहावीची परीक्षा दि. 2 मार्चला सुरू होणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक (Anuradha Oak, Maharashtra State Board) यांनी दिली आहे.
राज्य मंडळाने जाहीर केलेले सविस्तर संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
दहावी – बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
बारावीची परीक्षेचा कालावधी : २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०२३
दहावीच्या परीक्षेचा कालावधी : २ मार्च ते २५ मार्च २०२३ #Ssc #Hsc #Exams #महाराष्ट्र #विद्यार्थी @BeyondMarathi @MarathiBrain @Mh_Ded_Bed pic.twitter.com/dMRe3P6PlJ— Meenakshi gurav (@GMinakshi_Sakal) September 19, 2022
राज्य मंडळातर्फे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात दहावी तसेच बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात येते. परंतु मार्च 2020 मध्ये कोरोना आल्यानंतर पुढील दोन वर्षे संभाव्य वेळापत्रकच जाहीर करण्यात आले नव्हते. यंदा मात्र पुढील वर्षाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
हे संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि महाविद्यालयांना कळविण्यात येईल, असे ओक यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच या वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे 15 दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात, असेही राज्य मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.