जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती, तब्बल 528 मतं मिळाली; मार्गारेट अल्वांना 182 मतं

Jagdeep Dhankhar is Indias new Vice President of India
Share on Social Sites

नवी दिल्ली | New Delhi :

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड (NDA candidate Jagdeep Dhankhad) यांचा विजय झाला आहे. त्यांनी विरोधकांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांचा पराभव केला. जगदीप धनखड यांना तब्बल 528 मतं मिळाली तर मार्गारेट अल्वा यांच्या पारड्यात 182 मतं पडली आहेत. (Jagdeep Dhankhar is Indias new Vice President defeats oppositions Margaret Alva)

उपराष्ट्रपतीपदासाठी आज सकाळी 10 ते दुपारी 05 वाजेपर्यंत मतदान झालं. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यात 710 मतं वैध धरली गेली आणि यातील 528 मतं जगदीप धनखड यांना मिळाली. बहुमतानं सत्तेत असलेल्या भाजपाचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय जवळपास निश्चितच होता. त्यात तृणमूल काँग्रेसनं (Trinamool Congress) निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तसंच आणखी काही पक्षांनी भाजपाला (BJP) पाठिंबा दिला. त्यामुळे जगदीप धनखड यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला. (Jagdeep Dhankhad has won the election for the post of Vice President)

जगदीप धनखड यांच्या विजयानंतर भाजपा कार्यालयाबाहेर जल्लोष केला जात आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) देखील जगदीप धनखड यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या मतदानात समाजवादी पक्षाच्या (Samajwadi Party) 2, शिवसेनेच्या (Shiv Sena) 2 आणि बसपाच्या (BJP) एका खासदाराची अनुपस्थिती होती. तर भाजपाचे खासदार सनी देओल (BJP MP Sunny Deol) आणि संजय धोत्रे (Sanjay Dhotre) आरोग्याच्या कारणास्तव मतदान करू शकले नाहीत. एकूण 725 खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

कोण आहेत जगदीप धनखड? (Who is Jagdeep Dhankhad?)

  • जगदीप धनखड हे झुंजनू गावात (Jhunjanu village) एका शेतकरी कुटुंबात जन्माला आले. त्यांची एकेकाळी राजस्थानच्या (Rajasthan) राजकारणातील प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळख होती. सध्या ते पश्चिम बंगालच्या (West Bengal) राज्यपालपदी कार्यरत आहेत.
  • राजस्थान हायकोर्ट बार असोसिएशनचे (Rajasthan High Court Bar Association) अध्यक्ष असलेले धनखड हे राजकारणातील अनुभवी व्यक्तिमत्व आहे. राजस्थानमधील जाटांना आरक्षण मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
  • धनखड हे कायद्यावर प्रभुत्व असलेले, राजकारण, राजकीय डावपेच आणि प्रत्येक पक्षातील नेतेमंडळींशी मैत्रिपूर्ण संबंध असलेले असे व्यक्तिमत्व आहे.
  • पश्चिम बंगालमध्ये मारवाडी समाजाचा विशेष प्रभाव आहे. मारवाडी समाज व्यवसाया बरोबरच राजकारणातही सक्रीय असल्यानेच त्यांना पश्चिम बंगाल मधील राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले.

55 खासदारांची मतदानाला दांडी

उपराष्ट्रपती निवडणुकीत टीएमसीनं तटस्थ राहण्याचा निर्धार केला होता. टीएमसीच्या 34 खासदारांनी मतदान केलं नाही. भाजपच्या 2, समाजवादी पार्टीचे दोन आणि शिवसेना आणि बसपाच्या एका खासदारानं मतदान केलं नाही. मात्र, तृणमूल काँग्रेसच्या दोन खासदारांनी पक्षादेश डावलून मतदान केलं. शिशिर अधिकारी आणि दिब्येंदू अधिकारी (Dibyendu Adhikari) मतदान केलं आहे.

निकालापूर्वीच जगदीप धनखड यांच्या गावी जल्लोष

जगदीप धनखड हे मूळचे राज्यस्थानमधील आहेत. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला उभं राहण्यापूर्वी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. जगदीप धनखड यांच्या राजस्थानातील झुंझुनूमधील किठाणा गावात (Kithana village) गावकऱ्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली आहे. स्थानिक लोकगीतांच्या गायनासह जल्लोष करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात जगदीप धनखड यांची भेट घेणार आहेत. तर, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP President J. P. Nadda) देखील धनखड यांच्या भेटीला पोहोचणार आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपाठोपाठ उपराष्ट्रपती निवडणुकीत देखील भाजपप्रणित रालोआनं मोठं यश मिळवलं आहे.

See also  आईसह ३ मुलींवर भोंदूबाबाकडून बलात्कार; ८ लाख उकळले, धर्मांतराचाही प्रयत्न

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  नोकराचा प्रताप! मालकाचे ४० लाख रुपये चोरून गृहकर्जाचे हप्ते मुदतीआधीच भरले

Share on Social Sites