नाशिक l Nashik :
आपल्या आईची कंपनीतून नोकरी गेली व तिला तेथे काम करताना त्रास दिला गेला, याचा राग मनात धरून ‘त्या’ महिलेच्या मुलाने आपल्या तिघा मित्रांच्या मदतीने नंदकुमार आहेर (वय 50, रा. महात्मानगर, नाशिक) यांच्यावर तलवार, चॉपरने प्राण घातक हल्ला चढवून ठार मारल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. (Industrialist Nandkumar Aher murdered in Ambad MIDC Nashik)
पोलीसांनी या खुनाच्या घटनेचा तपास सुरू करत जखमी झालेल्या एका हल्लेखोराने दिलेल्या माहितीवरून या पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असल्याची शक्यता प्रथमदर्शनी पोलीसांनी वर्तविली आहे.
दरम्यान, या खुनाच्या घटनेतील चौघे संशयित हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून, एक खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत व त्याचे फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत असल्याचे नाशिक पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Nashik Police Commissioner Jayant Naiknaware) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये गरवारे पॉइंटजवळील (Garware Point, Ambad Industrial Estate) असलेल्या आहेर इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीत (Aher Engineering Works Company) नेहमीप्रमाणे नंदकुमार आहेर हे त्यांच्या स्कॉर्पिओ कारमधून (MH 15 GA 1861) आले. प्रवेशद्वारावर कारमधून ते उतरले असता दुचाकीने आलेल्या चौघांनी तलवार व चॉपरसारख्या धारधार हत्याराने त्यांच्यावर हल्ला चढविला.
Nashik Crime : असा झाला ‘त्या’ खुनाचा उलगडा; पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा
त्यांच्या डोक्यात, पोटात व पाठीवर खोलवर वार लागले. दोघा कामगारांनी त्वरित पाथर्डीफाटा (Pathardi Phata) येथील रुग्णालयात हलविले व तेथून पुन्हा अधिक उपचारासाठी जुना आडगावनाक्यावरील अपोलो रुग्णालयात (Apolo Hospital, Adgaon Naka) दाखल केले; मात्र तेथे डॉक्टरांनी आहेर यांना तपासून मृत घोषित केले.
घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. ‘गुगल’ श्वानाने (Google Dog) हल्लेखोरांचा माग दाखविला त्या दिशेने पोलीसांनी जात रस्त्यात संशयितांपैकी एकाची चप्पल पोलीसांना आढळून आली. ही चप्पल हुंगल्यानंतर गुगल श्वान आणखी पुढे गेले. चौघा हल्लेखोरांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशकात ‘या’ सहा हुक्का पार्लर्सवर पोलीसांची कारवाई; 14 जण ताब्यात
असा आला हल्लेखोर पोलीसांच्या जाळ्यात!
नंदकुमार यांच्यावर तलवार, चॉपरसारख्या धारदार शस्त्राने हल्ला चढविताना शस्त्राचा एक वार चुकून एका हल्लेखोराच्या पायावर लागला. यामुळे तो देखील रक्तबंबाळ झाला. त्याच्या साथीदारांनी त्याला दुचाकीवरून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांना विचारले असता त्याला कंपनीत काम करताना पत्रा लागल्याने तो जखमी झाला, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जखम बघून डॉक्टरांचा संशय बळावला असता त्याच वेळी नाशिक शहर डॉक्टर-पोलीस व्हॉट्सॲप ग्रुपवर (Nashik city Doctor Police WhatsApp group) खुनातील हल्लेखोर जखमी असून तो रुग्णालयात उपचारासाठी येऊ शकतो, असा मेसेज प्राप्त झाला. डॉक्टरांनी तो मेसेज वाचल्यानंतर त्यास उपचारासाठी दाखल करुन घेत पोलीसांना माहिती कळविली. घटनास्थळापासून काही अंतरावरच रुग्णालय असल्याने पोलीस तेथे पोहोचले; मात्र तोपर्यंत त्याच्या साथीदारांना चाहूल लागल्याने तिघे त्याला सोडून फरार झाले.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
Rule Changes from 1st June : 1 जूनपासून बँकिंग, विमा आणि गृहकर्जासह अनेक क्षेत्र...
Todays Horoscope : आजचं राशीभविष्य, गुरुवार 28 जुलै 2022 : ‘या’ राशींसाठी दिवस ठ...
Nashik Crime : असा झाला 'त्या' खुनाचा उलगडा; पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काढला ...
ठाकरे सरकारला 'जोर का झटका'; दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे ‘सर्वोच्च’ आदे...