England Vs India : मोक्याच्या क्षणी ‘बॉलर’ ढेपाळले! लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडिया वर्ल्ड कप मधून बाहेर

Share on Social Sites

एडिलेड । Adelaide :

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात (ICC Men’s T20 World Cup) आज गुरुवारी (दि. 10 नोव्हेंबर) दुसरा उपांत्य सामना खेळला गेला. (India Vs England Semi Final Live) भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 बाद 168 धावा केल्या. विराट कोहली (Virat Kohli) व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी झळकावलेली अर्धशतके भारतीय फलंदाजीची वैशिष्ट्य ठरले. (ICC Men’s T20 World Cup England beat India by 10 wickets in Semi final)

प्रथम फलंदाजी संधी मिळालेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब आणि थंड झाली.‌ के एल राहुल (K L Rahul) केवळ पाच धावा काढून माघारी परतला. कप्तान रोहितने जम बसल्यानंतर 27 तर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 14 धावा करून बाद झाले.‌ एका बाजूने शानदार पद्धतीने खेळत असलेल्या विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे स्पर्धेतील चौथे अर्धशतक ठरले. तसेच या दरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 4000 धावांचा टप्पा पूर्ण केला. त्याने 50 धावांची खेळी केली. यामध्ये 4 चौकार व एका षटकाराचा समावेश होता.

See also  उच्चशिक्षित तरुणाचा भलताच कारनामा; Play Boy बनायला गेला अन् बापाचे 17 लाख गमावून बसला

भारताचे फलंदाज एकामागून एक बाद होत होते, पण त्यावेळी संघाचा डाव सावरला तो विराट कोहलीने. कारण यावेळी फक्त संघाला डाव सावरला नाही तर त्याने विश्वविक्रमही रचला. कोहलीने आता टी20 क्रिकेटमध्ये चार हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीने हा विक्रम करत आपल्या नावाला एक वेगळे वलय निर्माण झाले आहे.

या विश्वचषकात कोहली भन्नाट फॉर्मात आहे. त्यामुळे आता कोहली या विश्वचषकात नेमक्या किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कोहली हा भारतासाठी मॅचविनर ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) या सामन्यात आपल्या लौकिकाला साजेशी फलंदाजी करत इंग्लिश गोलंदाजांवर जबर आक्रमण केले.

त्याने अखेरच्या तीन षटकांमध्ये तुफान फटकेबाजी केली. या दरम्यान त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने अखेरच्या चेंडूवर हिट विकेट होण्याआधी 33 चेंडूवर 63 धावा केल्या. इंग्लंडसाठी क्रिस जॉर्डन (Chris Jordan) याने सर्वाधिक तीन बळी मिळवले.

भारताचे पुनरागमन अशक्यच होते आणि भारतीय चाहत्यांच्या चेहऱ्यावर पराभव स्पष्टपणे दिसू लागला होता. बटलरने षटकार मारून इंग्लंडचा विजय पक्का केला. इंग्लंडने 16 षटकांत बिनबाद 170 धावा करून दणदणित विजय मिळवला. भारतावर 10 विकेट्स राखून विजय मिलवताना बटलर व हेल्सने वर्ल्ड कप इतिहासातील सर्वोत्तम भागीदारीची नोंद केली. बटलर 80 व हेल्स 86 धावांवर नाबाद राहिला.

See also  महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट?, धुळ्यात चौघांकडून तब्बल 89 तलवारी, 1 खंजीर जप्त
See also  Monkeypox : युरोपसह 12 देशांत 'मंकीपॉक्स'चा फैलाव; केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये, दिले 'हे' निर्देश

Share on Social Sites