आजच्या घडीला अनेक कंपन्या सर्वसामान्य नागरिकांना ज्यादा पैशांचा मोबदला देण्याचं आमिष दाखवत पैशांची गुंतवणूक करण्यास भाग पाडतात. ‘इतके’ लाख रुपये भरले तर ‘इतक्या’ दिवसांमध्ये तुम्हाला ‘इतके’ दुप्पट-तिप्पट पैसे करुन मिळेल, असे आमिष सर्वसामान्य गुंतवणूकदारांना दाखवले जाते. नागरिकांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असं आवाहन वेळोवेळी पोलीसांकडून केले जाते. (Four thousand People of Maharashtra fraud by Gujarat’s Shukul Group of Companies)
परंतु तरीही सर्वसामान्य माणसं आमिषाला बळी पडतातच. धुळे जिल्ह्यातील (Dhule) आणि गुजरातमध्ये (Gujarat) वास्तव्यास असलेल्या काही महाराष्ट्रातील बांधवांसोबत असंच काहीसं घडलं आहे. खान्देशातील (Khandesh) चार हजार पेक्षा जास्त गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. (Dhule Crime News)
गुजरात राज्यातील सुरत (Surat) येथील कंपनीने महाराष्ट्रातील नागरिकांना लुबाडल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. खान्देशातील सर्वसामान्य नागरिकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातला गेला आहे. जवळपास 4 हजार जणांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी धुळे आर्थिक गुन्हा शाखेकडे (Dhule Crime Branch) सुरत येथील शुकुल ग्रुप ऑफ कंपनी (Shukul Group of Company) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात (Dondaicha Police Station) गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी पहिल्या गुन्ह्यात 17 कोटी रुपयांपेक्षा अधिकची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. संपूर्ण गुन्ह्याची व्याप्ती ही तब्बल 75 कोटींपेक्षा अधिक असल्याचा पोलीसांना अंदाज आहे. पोलीसांनी या प्रकरणी आता पर्यंत दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. तर चार संशयित आरोपी हे अद्याप फारर आहेत.
सूरत येथील प्रदीप शुक्ला (Pradeep Shukla) ऊर्फ मुन्ना शुकूल (Munna Shukul), धनंजय बराड (Dhananjay Barad), देवेश सुरेंद्र तिवारी (Devesh Surendra Tiwari), संदीपकुमार मनुभाई पटेल (Sandeep Kumar Manubhai Patel) या चौघांनी पूर्वनियोजित कट रचून शुकूल वेल्थ ॲडव्हायजरी (Shukul Wealth Advisory), शुकूल वेल्थ क्रिएटर (Shukul Wealth Creator), मनी फाउंडर (Money Founder), डेली गेट (Daily Gate) अशा चार कंपन्यांची स्थापना केली. दोंडाईचा येथील आकाश मंगेश पाटील (Akash Mangesh Patil) आणि मंगेश नारायण पाटील (Mangesh Narayan Patil) या पिता पुत्रांना हाताशी धरून सोशल मीडियाच्या माध्यमातून कंपनीची जाहिरात सुरू केली.
या कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा 10% टक्के रक्कम मिळेल, असे आमिष दाखविले गेले. सन 2019 ते दि. 13 सप्टेंबर 2022 पर्यंत उत्तर महाराष्ट्रातील 4000 पेक्षा अधिक नागरिक या आमिषाला बळी पडले. या नागरिकांनी 56 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. सुरुवातील ठरल्याप्रमाणे रक्कम मिळत असल्याने गुंतवणूकदार वाढत गेले. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने लोक या फेक कंपनीच्या जाळ्यात अडकले.
याप्रकरणी स्वतःला या फेक कंपनीचे महाराष्ट्र प्रमुख सांगणारे दोंडाईचा येथील पिता-पुत्रांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर चार संशयित आरोपी हे अद्याप फारर आहेत. या प्रकरणी अजून कोणा कोणाची यात फसवणूक करण्यात आली आहे. आणि कोण कोण यात आरोपी आहे याचा तपास आता पोलिस करीत असल्याची माहिती धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील (Dhule District Superintendent of Police Praveen Kumar Patil) यांनी दिली.
आरोपींनी गुंतवणूकदारांना शेअर मार्केट आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये (Film Industry) गुंतवणूक करुन मोठा परतावा देण्याचे आमिष दिले होते. दोंडाईचा (Dondaicha) पोलीस या प्रकराची सखोल चौकशी करून दोषींना लवकरात लवकर अटक करून पुढील कारवाई करणार आहेत.