
नवी दिल्ली l New Delhi :
दिवसेंदिवस गगनाला भिडणाऱ्या पेट्रोल-डिझेलचे भाव आणि सोबतच वाढती महागाई या साऱ्यामुळेच देशात आता इलेक्ट्रिक वाहनांची चर्चा जोरदार सुरु व्हायला लागली आहे. लोक मोठ्या प्रमाणावर प्रदुषणविरहित वाहनांचा हा पर्याय वापरताना दिसत आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक बाईक्सना आग लागणे, अचानक स्फोट होणे (Electric Vehicle Fire), स्पार्किंग होणे अश्या एक ना अनेक घटना समोर येत आहे.
https://twitter.com/PTI_News/status/1522644912508145664
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारन एका विशेष समितीची स्थापना केली होती. या समितीचा प्राथमिक अहवाल समोर आला असून यामध्ये सर्व मॅन्युफॅक्चर्सच्या बॅटरींमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं म्हटलं आहे. (Government Committee finds almost all Electric Vehicle makers at fault over fire incidents in preliminary report)
वारंवार आगीच्या घटना समोर येत असल्यानं गेल्या महिन्यात सरकारनं या घटनांच्या चौकशीसाठी विशेष समिती नेमली होती. ओकीनावा ऑटोटेक (Okinawa Autotech), बूम मोटर (Boom Motor), प्युर इव्ही (Pure EV), जितेंद्र इव्ही (Jitendra EV), आणि ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) या कंपन्यांच्या स्कूटर्सना आग लागल्याचा घटना घडल्या होत्या. या सर्व आगीच्या घटनांमागे जवळपास या सर्व कंपन्यांच्या बॅटरी सेलमध्ये तसेच या बॅटरीजच्या डिझाईनमध्ये बिघाड असल्याचं प्राथमिक तपासणीत समोर आलं आहे.
https://twitter.com/BjpBottu/status/1522671569574580224