Ghatasthapana 2022 : ‘या’ पद्धतीनं करा घटस्थापना, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी

Navratri Ghatasthapana 2022 Shubh Muhurt and Puja vidhi
Share on Social Sites

मुंबई । Mumbai :

सोमवार, दि. 26 सप्टेंबर 2022 रोजी घटस्थापनेने (Ghatasthapana 2022) होणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माँ शैलपुत्रीची (Maa Shailputri) पूजा केली जाते. या दिवशी भाविक, अखंड ज्योती आणि देवीच्या मूर्तीची स्थापना करतात. (Importance Of Shardiya Navratri 2022)

शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या पवित्र उत्सवाची सुरुवात सोमवार, 26 सप्टेंबर 2022 रोजी घटस्थापनेने होणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माँ शैलपुत्रीची पूजा केली जाते. या दिवशी भाविक, अखंड ज्योती आणि देवीच्या मूर्तीची स्थापना करतात. नवरात्रीत घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे. (Ghatasthapana 2022 Navratri 2022 Shubh Muhurt and Pujavidhi)

या वर्षी 26 सप्टेंबर हा कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त आहे. सोमवारी सकाळी 6 वाजून 11 मिनिटं ते 7 वाजून 51 मिनिटं या वेळेत कलश बसवता येईल. दुसरीकडे, कलश स्थापना पूजा देखील अभिजित मुहूर्तावर सकाळी 11 वाजून 48 मिनिटं ते दुपारी 12 वाजून 36 मिनिटांपर्यंत करता येईल. याशिवाय दिवसातील इतर अनेक मुहूर्त आहेत ज्यात कलश किंवा घटस्थापना करता येते.

कलश स्थापित करण्याची पद्धत (Method of installing Kalash)

कलशाची स्थापना मंदिराच्या किंवा घराच्या उत्तर-पूर्व दिशेला (North-East direction) करावी. देवीची पावलं ठेवून त्याठिकाणी कलशाची स्थापना करावी. आंघोळ केल्यावर सर्वप्रथम ज्या ठिकाणी कलश स्थापित केला आहे त्या ठिकाणी शेणाने सारवावे किंवा गंगेचे पाणी शिंपडून पवित्र करावे. नंतर लाकडी चौकटीवर लाल रंगाचे स्वस्तिक बनवून कलश स्थापित करावा. कलशात पाणी किंवा गंगाजल भरावं आणि त्यात आंब्याचे पान ठेवावं. यानंतर कलशावर ठेवलेल्या ताटात काही धान्य भरून त्यावर नारळ ठेवा. तसेच कलशात एक सुपारी, काही नाणी, दुर्वा, हळद ठेवा. तांदळापासून अष्टकोन बनवा आणि त्यावर माँ दुर्गेची मूर्ती ठेवा. त्यांना लाल किंवा गुलाबी ओढणीने झाकून ठेवा.

कलशाच्या स्थापनेबरोबरच एक नंदादीप लावावा. कलश स्थापनेसोबतच पहिल्या दिवशी माँ शैलपुत्रीची पूजा करावी. हातात लाल फुले व तांदूळ घेऊन माँ शैलपुत्रीचे ध्यान केल्यानंतर मंत्राचा जप करून मातेच्या चरणी फुले व तांदूळ अर्पण करा. माँ शैलपुत्रीसाठी साजूक तुपातला प्रसाद करावा. अखंड ज्योतीमध्ये फक्त गाईच्या तुपाची शुद्धता असणारं आणि घरी बनवलेले तूप वापरावं.

See also  Google Dog : शाब्बास! नाशिक पोलिस श्वान पथकातील ‘गुगल’ने शाेधली अपहृत अकरा वर्षांची मुलगी

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  ऑस्ट्रेलियन क्रिकेटला आणखी एक झटका; ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्रयू सायमंड्सचा अपघाती मृत्यू

Share on Social Sites