‘हॉरर’ व्हिडिओ पाहून मुलाने आधी बाहुलीला फाशी दिली आणि मग…; काळजाचा ठोका चुकवणारी घटना

‘हॉरर’ व्हिडिओ पाहून मुलाने आधी बाहुलीला फाशी दिली आणि मग...; काळजाचा ठोका चुकवणारी घटना l Eight years old child hanging himself after watchin Horro video in Thergaon Pimpri Chinchwad Pune
‘हॉरर’ व्हिडिओ पाहून मुलाने आधी बाहुलीला फाशी दिली आणि मग...; काळजाचा ठोका चुकवणारी घटना l Eight years old child hanging himself after watchin Horro video in Thergaon Pimpri Chinchwad Pune
Share on Social Sites

पुणे l Pune :

लहान मुलांना मोबाईलचे वेड किती घातक ठरू शकत याचा प्रत्यय देणारी एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना नुकतीच पुण्यातील पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad, Pune) मध्ये घडली आहे. आई घरातील कामात व्यस्त असताना आठ वर्षांचा चिमुरडा ‘कमल’ (Kamal) आपल्या लाडक्या बाहुलीशी खेळत होता. (Eight years old child hanging himself in Thergaon Pimpri Chinchwad Pune)

Singer KK Death : ‘हम रहें या ना रहें कल, कल याद आयेंगे ये पल’; प्रसिद्ध गायक केके यांचे निधन

दरम्यान, त्याने खेळत असताना आपल्या बाहुलीला (Doll) त्याने फाशी दिली. एखाद्या कैद्याला फाशी देण्यापूर्वी चेहरा झाकतात अगदी तसाच त्याने बाहुलीच्या तोंडावर कपडा देखील बांधला होता. बाहुली आपल्याला सोडून गेल्याचा समज झाल्यानंतर कमलनेदेखील स्वतःच्या गळ्याभोवती दोरी बांधून गळफास घेतला.

कमलला मोबाईलवर ‘हॉरर’ फिल्म (Horror Film) पाहण्याची प्रचंड सवय होती. त्यामुळेच त्याच्याकडून असे कृत्य झाल्याचा अंदाज स्थानिक पोलीसांकडून व्यक्त केला जात आहे. ही घटना थेरगाव येथे घडली आहे.

तुमच्या घरात Cooler असेल तर सावधान; ‘या’ 5 वर्षांच्या मुलाबद्दल वाचाल तर डोळ्यातून येतील अश्रू

कमल खेम साऊद (वय 8, रा. सोळानंबर बस स्टॉप, थेरगाव) (Kamal Khem Saud, Solanambar Bus Stop, Thergaon) असे आत्महत्या केलेल्या चिमुरड्याचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 29) रोजी दुपारी दोनच्या सुमारास कमल आपल्या बाहुलीशी खेळत होता. त्यावेळी जवळच त्याचा लहान भाऊ आणि बहिण देखील खेळत होती. त्यावेळी कमलची आई घरकामात व्यस्त होती. तर, वडील कामा निमित्त बाहेर गेले होते.

दरम्यान, खेळत असतानाच कमलने अचानक बाहुलीच्या तोंडावर कापड गुंडाळून तिला फाशी दिली. बाहुली मृत पावल्याचा समज झाल्यानंतर कमलने खिडकीला बांधलेल्या दोरीने स्वतःही गळफास घेतला. काही वेळानंतर कमलच्या आईने खोलीत येऊन पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यवान माने (Satyavan Mane, Senior Inspector, Vakad Police Station) यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी त्यांनी चौकशी केली असता कमल मोबाईलवर नेमही ‘हॉरर’ व्हिडीओ पाहत असल्याचे समोर आले. त्यामुळे ‘हॉरर’ फिल्मचा एखादा सिन पाहूनच त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

महाराष्ट्रातील संतापजनक घटना : पोटच्या लेकरालाच 22 कुत्र्यांसोबत 2 वर्ष कोंडून ठेवलं; बाहेर येताच मुलाने…

..अन माय माऊलीच्या काळजात चर्रर्र झाले

मृत कमल दोन्ही मुलांपेक्षा वयाने मोठा आणि हुशार होता. आई कामात असताना तोच लहान भावंडाना सांभाळत होता. रविवारी दुपारी ज्यावेळी कमलच्या आईने खोलीत डोकावून पहिले तेव्हा बाहुलीचे तोंड बांधून तिला गळफास दिल्याचे तिला दिसले. तसेच, पोटाचा गोळा फासावर लटकलेले भयानक चित्र नजरेस पडले. कमलला अशा अवस्थेत पाहून तिने जोरात हंबरडा फोडला. कमल अशी गंमत करून नको, म्हणून आईने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता.

…अन् झोका देणे जीवावर बेतले, 6 महिन्याच्या भावासह बहिणीचा अंत; खान्देशातील हृदयद्रावक घटना

See also  IPL Auction 2022 : मेगा ऑक्शनमध्ये Unsold असलेल्या खेळाडूंचं काय होणार?

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites