नवी दिल्ली l New Delhi :
गुगल (Google) कंपनीने नुकतंच आपल्या गुगल प्ले स्टोर (Google Play Store) च्या पॉलिसीमध्ये काही महत्वपूर्ण बदल केले आहेत. जे उद्याच्या बुधवार (दि. 11) मे पासून लागू होतील. पॉलिसी सहित अनेक बदल यात दिसून येतील यातील एक
महत्वाचा बदल म्हणजेच अँड्रॉइड (Android) मध्ये कॉल रेकॉर्डिंग (Call Recording Apps) ॲप्स नेहमीसाठी बंद होणार आहेत. (Google will kill all third party call recording Apps on Android)
Google हळूहळू अनेक Android व्हर्जनवर कॉल रेकॉर्डिंग सक्षम करणारे (Application Programming Interface (API) कमी करत आहे आणि काढून टाकत आहे. कंपनी हे प्रायव्हसी आणि सेक्युरिटीच्या नावाखाली करते आणि तसेच कॉल रेकॉर्डिंगचे (Call Recording news) कायदे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगळे आहेत यासाठी हे केले जात आहे.
Google will kill call recording apps starting tomorrow…
— . (@EinsteinModern) May 10, 2022
Android 10 मध्ये, Google ने डीफॉल्टनुसार कॉल रेकॉर्डिंग ब्लॉक केले आहे. त्यामुळे हे टाळण्यासाठी, Play Store ॲप्सने कॉल रेकॉर्ड करण्यासाठी Accessibility API वापरण्यास सुरुवात केली होती. पण उद्यापासून (दि. 11) गुगलने नवीन बदल लागू केल्यानंतर हे ही शक्य होणार नाही.
Twitter वापरासाठी ‘या’ युजर्सना लवकरच द्यावे लागणार पैसे; कोण ‘फ्री’ वापरु शकणार ट्विटर?
‘हा’ नियम फक्त थर्ड पार्टीसाठी
Google ने सांगितले की Google ची ही पॉलिसी केवळ Play Store वरील थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग ॲप्सपुरते मर्यादित आहे. एमआय डायलर (Mi Dialer) सह गूगल पिक्सल (Google Pixels) किंवा शाओमी (Xiaomi) फोन सारख्या फोनवर नेटिव्ह कॉल रेकॉर्डिंग फंक्शन (Native Call Recording Function) प्रभावित होणार नाही.
त्यामुळे, जर तुम्हाला अँड्रॉइड स्मार्टफोनवर कॉल रेकॉर्डर फिचर वापरायचे असेल, तर असे काही ब्रँड आहेत जे ते त्यांच्या डिव्हाइसमध्ये हे इंटर्नल फिचर (Internal Features) म्हणून देतात. यामध्ये Xiaomi / Redmi / Mi, Samsung, Oppo, Poco, OnePlus, Reality, Vivo आणि Tecno मोबाईल कंपन्यांचा समावेश आहे.
क्या बात हैं.. आता WhatsApp वरुनही चित्रपट, वेबसिरिज पाठवता येणार
आपण पाहतो की, बाजारात उपलब्ध असलेले अनेक लोकप्रिय स्मार्टफोन कॉल रेकॉर्डिंग फिचर मोबाइलमध्ये देतात. त्यामुळे, कॉल रेकॉर्डिंग ॲप्स ब्लॉक करण्याच्या Google च्या निर्णयाचा अर्थ असा नाही की तुम्ही कॉल रेकॉर्ड करू शकत नाही.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
Today's Horoscope : जाणून घ्या आजचे तुमचे राशी मंथन अन् पंचांग, गुरुवार, 04 ऑगस्...
धुळे : खळबळजनक.. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील तब्बल 68 पोलिसांना जेवणातून विषबाधा
...म्हणून 'त्याने' रचला उद्योजक आहेर यांचा हत्येचा कट; नाशिक पोलीस आयुक्तांनी के...
शाळेत अंदाधुंद गोळीबार; 18 विद्यार्थ्यांसह एकूण 21 जणांनी गमावला जीव