आज सर्वात जास्त लोकप्रिय असलेले मेसेजिंग अँप WhatsApp वर संपूर्ण जग अवलंबून आहे. परंतु गेल्या पाऊण तासांपासून व्हॉट्सअँपची सेवा बंद आहे. व्हॉट्सअँप बंद असल्याने युझर्स हवालदिल आहेत. (Whatsaap Server Down in Many country)
जगातील अनेक भागात व्हॉट्सअँप बंद असल्याची माहिती आहे. व्हॉट्सअँप बंद असल्याने अनेक व्यवहार देखील ठप्प झाले आहेत. काही तांत्रिक बिघाडामुळे WhatsApp बंद झाल्याची माहिती समोर येत आहे.
WhatsApp services have been down for the last 30 minutes. pic.twitter.com/9WL4mMFTRO
— ANI (@ANI) October 25, 2022
व्हॉट्सअँप (WhatsApp) सर्व्हर (WhatsApp Server Down) डाऊन झाल्यामुळे मेसेज समोरच्या पर्यंत पोहचत नाही आहे. त्यामुळे युजर्सना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Me after restarting my phone, putting it on airplane mode and uninstalling whatsapp and then coming to Twitter 😭#whatsappdown#whatsappdown pic.twitter.com/azHsK1tPfb
— JACKIE APPU (@JACKIEAPPU1) October 25, 2022
व्हॉट्सअँपवर येणाऱ्या समस्येबाबत कंपनीने अद्याप कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही. तर, दुसरीकेड ट्विटरवर व्हॉट्सअँप डाऊन असा हॅशटॅग ट्रेंड (WhatsApp Server Down Trend) करत आहे. ऐन सणासुदीच्या काळात व्हॉटअप डाऊन झाल्याने अनेक युजर्सला शुभेच्छा देण्यास व्यत्यय येत आहे.
WhatsApp Restored : हुश्श! अखेर दोन तासांनंतर ‘व्हॉट्सअॅप’ सुरू झालं