Mithilesh Chaturvedi Death : बॉलिवूडवर शोककळा! ‘कोई मिल गया’ फेम’ अभिनेत्याचं निधन

Koi Mil Gaya fame Mithilesh Chaturvedi passes away
Share on Social Sites

मुंबई | Mumbai :

बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीतून पुन्हा एक दु:खद बातमी आहे. लोकप्रिय अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन झालं. काल (दि. 03) ऑगस्टला लखनौ (Lucknow) येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिथिलेश हे हृदयासंबधी आजाराने ग्रस्त होते. त्यांचे जावई आशीष चतुर्वेदी (Ashish Chaturvedi) यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (Bollywood Actor Mithilesh Chaturvedi passed away)

रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला होता. यानंतर ते त्यांच्या मूळ गावी लखनौला शिफ्ट झाले होते. मिथिलेश यांनी सत्या (Satya Movie), ताल (Taal Movie), फिजा (Fiza Movie), कोई मिल गया (Koi Mil Gaya Movie) आणि रेडी (Ready Movie) सारख्या सिनेमांत काम केले होते. (Veteran actor Mithilesh Chaturvedi passes away)

मोहल्ला अस्सी (Mohalla Assi Movie), फटा पोस्टर निकला हिरो (Fata Poster Nikla Hero Movie) या चित्रपटांतही ते झळकले. टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी काम केले. नीली छतरी वाले (Neeli Chhatri Wale TV serial) या लोकप्रिय टीव्ही मालिकेत त्यांनी आत्माराम चौबेची (Atmaram Choubey) भूमिका साकारली होती. 2016 साली सलीम यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द कॉमेडी ऑफ एरर्स’ (The Comedy of Errors) या नाटकात त्यांनी विलियम शेक्सपीअरची (William Shakespeare) भूमिका केली होती. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

See also  नाशकातील 'या' बँकेचा परवानारद्द; रिझर्व्ह बँकेची कारवाई; खातेधारकांवर काय परिणाम होणार?
See also  Nashik : ‘शिवशाही’ला भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार, अनेक जखमी

Share on Social Sites