मुंबई l Mumbai :
बंडखोर नेते एकनाथ शिंदे (MLAs rebel leader Eknath Shinde) यांचे आमदार येत्या दोन दिवसांत मुंबईत येतील आणि येत्या रविवार पर्यंत नवे सरकार आलेले असेल असा दावा भाजपाच्या (BJP) गोटातून करण्यात येतो आहे. मात्र सरकार स्थापण्यापूर्वी खातेवाटपावरुन पेच सुरु असल्याची माहिती आहे. बंडखोर आमदार मुंबईत उतरल्यापासून ते सरकार स्थापनेपर्यंतचा प्रवास हा म्हणावा तेवढा सोपा असणार नाहीये.
Maharashtra CM & Shiv Sena chief Uddhav Thackeray appeals to party MLAs in Guwahati, to come & discuss; said "Many of you are in touch with us, you're still in Shiv Sena at heart; family members of some MLAs have also contacted me & conveyed their sentiments to me…"
(file pic) pic.twitter.com/6pfhtQs7Go
— ANI (@ANI) June 28, 2022
शिवसेना आणि महाविकास आघाडी (Shivsena and Mahavikas Aghadi MVA) हे सगळे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करणार हे निश्चित आहे. मात्र हे बाहेरचे संकट सोडवण्याबरोबरच सत्ता स्थापनेतील खातेवाटपाचा संघर्ष हाही शिंदे आणि भाजपा (BJP) सरकारला करावा लागणार आहे. मुख्यमंत्रीपद एकनाश शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे असावे, अशी मागणी बंडखोर आमदारांकडून होते आहे.
तयारीला लागा! राज्यात 7,231 पदांसाठी पोलीस भरती होणार; राज्य मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील
यात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मध्यस्थी करुन नरेंद्र मोदींशी (Narendra Modi) बोलावे असे आवाहनही दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केले आहे. आता खातेवाटपावरुनही एकनाथ शिंदे दोन खात्यांसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या पत्रकाराने याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.
BJP close to form new govt with Sena rebel Eknath Shinde camp, but there are many bone of contentions that yet to be ironed out. Eknath Shinde insisting keeping urban development & finance ministry while BJP is reluctant to give. They wants to keep both of these cream portfolios.
— Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) June 28, 2022