Apple iPhone 14 Launch : बहुचर्चित! iPhone 14 अखेर लॉन्च; भन्नाट फीचर्ससह किंमतही आहे तगडी, जाणून घ्या सर्व काही!

iPhone 14 (3)
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

जगातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी अ‍ॅपलने आयफोन 14 सिरीजअंतर्गत फोन लॉन्च केले आहेत. त्यामुळे जगभरातील अ‍ॅपल आयफोन (Apple iPhone) प्रेमींची प्रतिक्षा आता संपली आहे. Apple Far Out इव्हेंटमध्ये कंपनीने आपली नवीन iPhone 14 सीरीज लॉन्च केली आहे. या सिरीजअंतर्गत iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Plus तसेच कंपनीचे नवीन स्मार्टवॉच Apple Watch आणि नवीन Buds लॉन्च करण्यात आले आहेत. (Apple iPhone 14 Launch, Check details here)

भारतीय ग्राहक iPhone 14 हा फोन 79,900 रुपयांना आणि iPhone 14 Plus हा फोन 89,900 रुपयांना खरेदी करू शकतात. iPhone 14 ची विक्री 16 सप्टेंबरपासून सुरू होईल, तर iPhone 14 Plus ची विक्री येत्या दि. 07 ऑक्टोबरपासून होईल. iPhone 14 Pro ची किंमत 1,29,900 रुपयांपासून सुरू होते जी गेल्या वर्षीच्या iPhone 13 Pro पेक्षा 10,000 रुपये जास्त आहे. iPhone 14 Pro Max ची किंमत 1,39,900 रुपयांपासून सुरू होते जी 2021 च्या iPhone 13 Pro Max पेक्षा 10,000 रुपये जास्त आहे.

हा सेल दि. 16 सप्टेंबरला सुरू होणार असून यासाठी आजपासूनच प्री-ऑर्डर करता येणार आहे. त्याचप्रमाणे अ‍ॅपलचे AirPods Pro भारतात 26,900 रुपयांना उपलब्ध होईल. ते दि. 9 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डर करता येणार आहेत, याची विक्री दि. 23 सप्टेंबरपासून सुरु होईल. अ‍ॅपलच्या स्मार्टवॉचचीही घोषणा करण्यात आली आहे. भारतात वॉच सीरीज 8 ची किंमत 45,900 रुपये असेल. SE 2 चे वॉच 29,900 रुपयांपासून सुरू होईल.

iPhone 14 to launch on September 7, Check out details

अ‍ॅपलच्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये A15 बायोनिक चिपसेट देण्यात आली आहे. यासोबतच iPhone 14 मध्ये क्रॅश डिटेक्शन, इमर्जन्सी SOS सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी यासारखे सेफ्टी फीचर्सही देण्यात आले आहेत. त्याच बरोबर आयफोन 14 सीरीजचे यूएस मॉडेल सिम ट्रे देखील काढत आहे. Apple सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीद्वारे आपत्कालीन स्थितीसाठी SOS फीचर आणत आहे. परंतु सध्या फक्त यूएस आणि कॅनडासाठी हे फीचर रिलीझ केले आहे.

See also  एप्रिल फूल नव्हे, एप्रिल फायर!; ग्राहकांना झटका, सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

Apple iPhone 14 मध्ये 6.7-इंचाचा OLED डिस्प्ले आहे. iPhone 14 मध्ये A15 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे. यावेळी iPhone 14 सिरीजमध्ये 5-कोर GPU आणण्यात आला आहे. कॅमेरा फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर, आयफोन 14 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये सेल्फीसाठी 12 एमपी प्राइमरी आणि 12 एमपी सेटअप देण्यात आला आहे.

हे कमी-प्रकाशातील चांगले फोटो टिपता येणार आहे. फ्रंट कॅमेरामध्ये ऑटोफोकस देखील उपलब्ध आहे. अ‍ॅपलचे म्हणणे आहे की, यावेळी सॉफ्टवेअरमुळे तिन्ही कॅमेर्‍यांमध्ये कमी-प्रकाशातही चांगले फोटो काढता येणार आहे.

https://twitter.com/Apple/status/1567584016051863552

आयफोन 14 पाच रंगांमध्ये सादर (iphone 14 color variants)

अ‍ॅपलचा दावा आहे की, आयफोन 14 हा सर्वात फास्ट फोन आहे. Apple iPhone 14 पाच रंगात लॉन्च करण्यात आलाआहे. यामध्ये मिडनाईट, स्टारलाइट, ब्लू, पर्पल आणि रेड यांचा समावेश

https://ekhabarbat.com/countries-where-apple-iphone-13-is-cheaper-than-india-and-brazil-know-all-details/

सिम कार्ड स्लॉट मिळणार नाही

यावेळी Apple ने iPhone 14 मध्ये सिम कार्ड स्लॉट ठेवलेला नाही. तो काढण्यात आला आहे. मात्र कंपनीने हे फक्त अमेरिकेत लॉन्च केलेल्या फोनसाठी केलं आहे. भारतात सिम कार्ड स्लॉट दिला जाऊ शकतो.

स्पेसिफिकेशन (iPhone 14 Specifications)

आयफोन 14 स्क्रीन डिस्प्ले 6.1 इंच तर आयफोन 14 प्लस स्क्रीन डिस्प्ले 6.7 इंचाचा आहे.

दोन्ही आयफोन A15 बायोनिक चिपसेटसोबत उपलब्ध आहे.

आयफोन 14 – फ्रंट कॅमेरा आणि मेन कॅमेरा – 12 एमपीचा देण्यात आला आहे.

नवीन फोन 5जी आणि ई-सीमसोबत उपलब्ध आहे.

कार क्रॅश डिटेक्शन फीचर उपलब्ध मिळणार.

https://ekhabarbat.com/apple-launches-four-phones-of-iphone-13-series-know-features-and-price/

See also  काय सांगता! ४२ सेकंदात YouTuber ने केली तब्बल १ कोटी ७५ लाख रुपयांची कमाई; कसं झालं शक्य?
See also  Anjali Arora Leaked MMS : 'कच्चा बदाम' रील फेम अंजली अरोराचा 'तो' व्हिडिओ लीक झाल्यानं खळबळ! 'ती' म्हणाली...

Share on Social Sites