बेळगाव l Belgaum :
हुबळी-धारवाडच्या तरीहाळा बायपासवर भीषण अपघात (Major Accident at Hubli-Dharwad’s Tarihala bypass) झाला आहे. ट्रक आणि खासगी बस यांच्यात जोरदार धडक झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, 8 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 26 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Damini App : आता पंधरा मिनिटेआधी कळणार, वीज कुठे पडणार, ‘दामिनी अॅप’ देणार अलर्ट
कोल्हापूरहून बंगळूरकडे (Kolhapur to Bangalore) जाणारी खासगी बस आणि तांदूळ वाहून नेणारा ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन 8 जण ठार झाले आहेत. मध्यरात्री (दि. 24) 12 च्या सुमारास हुबळी जवळ तारीहाल क्रॉस फाट्याजवळ (Tarihal Cross Phata) हा अपघात झाला. मृतांमध्ये 6 जण कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) असल्याची माहिती आहे.
7 dead, 26 injured in road accident in Karnataka's Hubli
Read @ANI Story | https://t.co/G1JyKtT0eq#Karnataka #Hubli pic.twitter.com/zpjzWTcqIF
— ANI Digital (@ani_digital) May 24, 2022
कोल्हापूरहून हुबळीला निघालेल्या नॅशनल ट्रॅव्हल्स कंपनीच्या (National Travels Company) बसचा तसेच तांदूळ भरून निघालेल्या लॉरीची समोरासमोर धडक झाली. मृतांमध्ये ट्रक चालक, वाहक तसेच आणखी एकटा आणि बसमधील चार प्रवाशांचा समावेश आहे. बाबासाहेब (वय 55 , रा. चिकोडी (Chikodi), मोहम्मद दयान (वय 17, रा. मैसूर (Mysore) अशी दोन मृतांची नावे आहेत.
कोल्हापूरहून चिकोडी, बेळगावसह अन्य शहरातील प्रवासी आहेत. त्यामुळे मृत व जखमी प्रवाशांमध्ये कोल्हापूरसह विविध ठिकाणचे प्रवासी असण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे. 28 प्रवाशी जखमी असून त्यांना हुबळीच्या KIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
K'taka | Seven people died after their vehicle hit a tree in Nigadi,Dharwad last night; 10 people injured. 21 people were travelling to Benkankatti in the vehicle, after attending a wedding
Police say "Investigation on. Case registered u/s 304 A IPC(causing death by negligence)" pic.twitter.com/JVdHfdL0vk
— ANI (@ANI) May 21, 2022