Helicopter Crash In Kedarnath : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून 6 जणांचा मृत्यू

Share on Social Sites

उत्तराखंड । Uttarakhand :

केदारनाथ येथे हेलीकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मदतकार्यासाठी पथके तात्काळ रवाना झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेचे कारण केदारनाथमधील दाट धुके असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाला असा अंदाज बांधण्यात येत आहे. (Uttarakhand : Helicopter carrying Kedarnath pilgrims crashes, 6 dead)

गुप्तकाशीहून (Guptkashi) जेव्हा हे हेलिकॉप्टर केदार घाटीकडे निघाले तेव्हा ते गरुडचट्टी येथे कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये 6 जण होते. हे हेलिकॉप्टर खासगी कंपनीचं असल्याचं सांगण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 21-22 ऑक्टोबर रोजी केदारनाथ (Kedarnath) आणि बद्रीनाथला (Badrinath) भेट देणार असताना ही घटना घडली आहे.

2019 मध्येही केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले होतं. प्रवाशांना केदारनाथहून फाटा इथे घेऊन जात असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाला इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं आणि या दरम्यान हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. लँडिंग करताना हेलिकॉप्टरचा मागील भाग जमिनीवर आदळल्याने हा अपघात झाला होता. सुदैवाने हेलिकॉप्टरच्या वैमानिकासह सहा प्रवाशांना कोणतीही इजा झालेली नव्हती.

See also  Ghatasthapana 2022 : 'या' पद्धतीनं करा घटस्थापना, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  वा रे वा नाशिक पोलिस! थेट पोलिस चौकीतच रंगली 'ओली पार्टी'; Video काढणाऱ्यांना चोप

Share on Social Sites