एसटी बस पुल तोडून नर्मदा नदीत कोसळली.. 12 प्रवाशांचे मृतदेह सापडले, 25 प्रवाशी बेपत्ता, खान्देशातील अनेकांचा समावेश

MSRTC Bus Accident Indore
Share on Social Sites

इंदूर l Indore :

मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) धार जिल्ह्यातील खलघाट (Khalghat, Dhar) येथे मोठा अपघात झाला आहे. महाराष्ट्राची एसटी बस (Maharashtra State Road Transport Corporation MSRTC) इंदौरहून अमळनेरकडे (Amalner) येत होती, यावेळी ती पुलावरून नर्मदा नदीपात्रात (Narmada River) कोसळली. यामध्ये 12 प्रवाशांचे मृतदेह सापडले असून 15 जणांना वाचविण्यात यश आले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर डेपोची (Amalner Depo) एसटी बस आहे. (12 dead as Maharashtra Roadways bus falls off bridge in MP’s Dhar)

खलघाट संजय सेतू पुलावरून (Sanjay Setu) नियंत्रण गमावल्याने एसटी बस 25 फूट खोल असलेल्या पुराच्या पाण्याने भरलेल्या नदीपात्रात कोसळली. यानंतर तातडीने मदत कार्य सुरु करण्यात आले. अँम्बुलन्सद्वारे धामनोद सरकारी हॉस्पिटलमध्ये (Dhamnod Government Hospital) जखमींना उपचारासाठी नेण्यात आले आहे. 30 ते 35 प्रवासी बुडाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेला एसटी महामंडळाच्या जळगाव विभागाचे (Jalgaon Division of ST Corporation) विभाग नियंत्रक भगवान जगनोर (Bhagwan Jaganor) यांनी दुजोरा दिला.

See also  'अभिनव भारत' निधी श्रेयासाठी खा. हेमंत गोडसे यांचा केविलवाणा प्रयत्न; आ. फरांदे यांचा थेट आरोप

Bus Driver C E Patil घटनास्थळी पोलीस आणि गोताखोर प्रवाशांचा शोध घेत आहेत. NDRF ची टीम देखील घटनास्थळी पोहोचलेली आहे. या बसमध्ये एकूण 40 प्रवासी होते असे सांगतिले जात आहे. यापैकी महाराष्ट्रातील किती याची आकडेवारी मिळू शकलेली नाही.

सकाळी ही बस इंदूरहून निघाली, वाटेत खलघाटात ही बस नर्मदा नदीत कोसळली. एमएच 40 NA 9848 असा या बसचा क्रमांक आहे. बसचालक सी. ई. पाटील (Bus Driver C E Patil) व वाहक पी. एस. पाटील (Bus Conductor P S Patil) यांच्याशी संपर्क होत नसल्याची माहिती अमळनेर आगार (Amalner Agar) प्रमुख अर्चना भदाणे (Archana Bhadane) यांनी दिली.

13 लहान मुलांचा प्रवाशांत समावेश

इंदूरजवळ अपघात झालेली एसटी बस ही जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आगारची असल्याची माहिती समोर आली आहे. इंदूरमधून ही बस सकाळी 7.30 ला अमळनेरच्या दिशेने रवाना झाली होती. या बसमध्ये 13 लहान मुले या बसमधून प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातातून 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे. पूर्ण क्षमतेनेही बस भरलेली होती. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक प्रवाशी वाहून गेल्याची भीती वर्तवली जात आहे.

शिंदे-चौहान यांच्यात चर्चा

दरम्यान, या बस दुर्घटनेसंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra Chief Minister Eknath Shinde) यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान (Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan) यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. दुर्घटनेसंदर्भात सर्व मदत तात्काळ करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. दुर्घटनेतील सर्व मृतदेह सन्मानाने महाराष्ट्रात पाठवण्यात येतील, असे शिवराज सिंग चौहान यांनी शिंदे यांना सांगितले. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाच्या प्रयत्नांची माहिती दिली, तसेच मंत्र्यांना घटनास्थळी पाठवल्याची माहितीही शिंदे यांना दिली.

See also  12 तासांमध्ये बदललं राज्याचं राजकारण; नाराज एकनाथ शिंदेंचे ठाकरे सरकारला हे 'तीन' प्रस्ताव, 'इथून' पडली बंडाची ठिणगी

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites