Nashik Bus Accident : नाशकात ‘बर्निंग बस’चा थरार! 12 जणांचा होरपळून मृत्यू; नेमकं काय घडलं ?

Nashik fire news update
Share on Social Sites

नाशिक । Nashik :

राज्यातील नाशिक येथे मोठी दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. एका खासगी बसला (Nashik Bus Fire) भीषण आग लागून अनेकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. नाशिक-औरंगाबाद मार्गावर (Nashik-Aurangabad Highway) नांदूरनाका (Nandurnaka) या ठिकाणी हा अपघात झाला आहे. अपघातात 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 38 प्रवासी जखमी झाले आहे. (12 dead, 38 injured after bus catches fire on Aurangabad road in Nashik after hitting a container)

अपघातात होरपळून 12 जणांचा जागीच मृत्यू

यवतमाळहून मुंबईकडे (Yavatmal to Mumbai) जाणाऱ्या खासगी बसचा नाशिक येथे अपघात झाला. या बसला भीषण आग लागली. आग एवढी भीषण होती की काही वेळात आगीत झालेल्या स्फोटाने परिसरातील नागरिक खडबडून जागे झाले. ही बस स्लीपर कोच होती. दरम्यान या आगीत 12 जणांचा मृत्यू झालाआहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीसांचे पथक दाखल झालं आहे. 38 जण जखमी झाले असनू जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी घटनेबाबत शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या (Chintamani Travels) बसला आग लागून हा भीषण अपघात झाला आहे. धुळ्याहून (Dhule) मुंबईला जाणाऱ्या ट्रेलरची बसला धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. ट्रेलरची बसला धडक बसली, यामुळे बसने पेट घेतला. अग्निशमन दलाकडून अपघातातील जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती ट्रॅव्हल्स कंपनीचे मालक गुड्डू यांनी दिली आहे.

बसला ट्रेलरची धडक झाल्यानं अपघात

नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची (Hotel Mirchi) चौकात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात खासगी प्रवाशी बस जळून खाक झाली. ही आग एवढी भीषण होती की 12 जणांचा मृत्यू झाला. पहाटे 04 वाजून 20 मिनिटांनी हा अपघात झाला.

See also  मालेगाव महापालिकेत काँग्रेसचा सुफडा साफ, आमदारासह २८ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  पोलीस चौकीतील ओली पार्टी भोवली; 'ते' चार मद्यपी पोलीस थेट निलंबित

Share on Social Sites